तुम्हाला नागीण हा त्वचा रोग माहीतच असेल खरं तर या रोगाबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्याच आपण आज दूर करणार आहोत, काही लोक म्हणतात की हा त्वचारोग झाल्यावर त्याचे नाव घेत नाही त्यामुळे हा रोग अजुन वाढतो शिवाय यात नागीणचे तोंड आणि शेपूट हे एकत्र जुळले तर मात्र त्या व्यक्तीचा जीव गेलाच पण हे खरे आहे का? तर मुळीच नाही हा एक त्वचा रोग आहे आणि वेळीच योग्य ते उपचार केल्यावर हा रोग बरा होतो.
हा आजार झाला आहे कसे ओळखलं तर त्या भागात बारीक बारीक असे पाण्याने भरलेले पुरळ उठतात आणि तिथे खूप ठणकत असते शिवाय त्या जागी चट्टे ही उठतात. जास्त करून हा आजार आपल्या शरीरातील चेहरा, पोट, छाती आणि हात या भागांवर जास्त प्रमाणात असतो. हा आजार कोणत्या कारणामुळे होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तर तुमच्या शरीरात पित्त वाढल्याने आणि पित्त आणि रक्त दोन्ही दूषित झाल्या मुळे हा आजार होतो.
खारट, तिखट, आणि उष्ण पदार्थांचा आहारात जास्त समावेश तसेच आंबवलेले पदार्थ, दारू, दही यांचा ही जास्त समावेश असणे यामुळे हा विकार होतो. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ही कमी होते. हा आजार झालेल्या रोग्याला खूप त्रास होत असतो. त्या ठिकाणी जास्त खाज येणे आणि आग ही होत असते. त्यामुळे रोगी या आजाराला खूप कंटाळला जातो. हा आजार शरीरावर पसरण्याची गती जास्त असते
हा आजार झाल्यावर रोग्याने जास्त दगदग करणे टाळावी. तसंच रोज हलका आहार घ्यावा. अंघोळी केल्यानंतर नागीण झालेली जागा स्वच्छ पुसून घ्यावी. स्वतःचे कपडे वापरावे रोग्याचे साबण, अंथरुण, पांघरुण वेगळे ठेवावे आणि स्वच्छता बाळगावी.
तांदळाच्या पिठात दुर्व्याचा रस कडून मिसळून हे औषध त्या ठिकाणी लावावे तुम्हाला फरक जाणवेल, आग कमी होईल दुर्वा थंड असल्याने लवकर फरक पडेल.
“असायक्लोव्हिर” या नावाचे ट्यूब तुम्हाला मेडिकल मध्ये मिळेल हे त्या ठिकाणी लावा आणि त्याच नावाच्या गोळ्या ही उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकर बरे वाटेल.