आज शिवरायांची जयंती, सर्वकडे आनंद उत्सव सुरू असताना नागराज मंजुळे ह्यांनी खूप मोठी आनंदाची बातमी रसिक प्रेक्षकांना दिली आहे. अनेक वर्षापासून मराठी इंडस्ट्री मध्ये एक गोष्ट खूप वायरल झाली होती. ती म्हणजे रितेश देशमुख लवकरच शिवरायांवर सिनेमा करतोय असे ऐकायला मिळत होते. पण ह्याच गोष्टीला आज पूर्ण विराम मिळाला. रितेश आणि जेनेलिया आपल्या मुंबई फिल्म कंपनी मार्फत ह्या सिनेमाची निर्मित करणार आहेत.
नागराज मंजुळे ह्यांनी आज ह्या गोष्टीची औपचारिक घोषणा केली. स्वतः नागराज ह्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. कदाचित ह्याच दिवसासाठी माझा जन्म झाला असेल असे नागराज ह्यांनी सांगितले. ह्या सिनेमात रितेश देशमुख अजय अतुल आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा सोबत असणार आहेत. त्यामुळे सिनेमा किती भव्यदिव्य असू शकतो ह्याचा विचार आपण करू शकतो.
शिवरायांची महागाथा सांगणारा हा सिनेमा वेगवेगळ्या टप्प्यात असेल. ट्विट मध्ये आधी शिवाजी, राजा शिवाजी आणि छत्रपती शिवाजी असे नमूद केले आहे. म्हणजेच ह्या सिनेमाचे कदाचित तीन भाग आपल्याला पाहायला मिळतील. हा सिनेमाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित असे नमूद करण्यात आले आहे. फक्त कोणत्या महिन्यात होईल ह्याबाबत गोपनीयता बाळगली आहे.
मित्रानो ह्या आजच्या दिवशी एवढी मोठी बातमी ऐकायला मिळाली आहे, ह्याच्यावर तुमचे काय मत आहे आम्हाला नक्की कळवा.