मित्रांनो गाव म्हटलं की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे किस्से असतात हे किस्से आपल्या आयुष्यात ही कधीतरी घडलेले असतात किंवा त्यांबद्दल आपण कोणाकडून तरी ऐकलेले असते, म्हणजेच लहान असल्यापासून ते मोठे होईपर्यंत आपल्याच घरातील किंवा शेजारील लोकांकडून काही अशा कथा ऐकलेल्या असतात त्या आठवून अंगावर काटा येतो तर कधी भीतीने शरीराचा थरकाप होतो. कधी कधी रात्री झोपेत दचकायला होते तर कधी आपण स्वप्नात तेच भीतीदायक प्रसंग पाहतो आणि जीव भांड्यात पडतो.

अशीच एक कहाणी आहे ती म्हणजे अमेय या एका मुलाची,खूप वर्ष गावी जाण्यासाठी टाळाटाळ करून शहरात रमलेला पण यावेळी त्याला गावाला जाणे भाग पडते कारण त्याचे वडील यांचा निर्जीव देह नदीमध्ये सापडतो, ही बातमी कळल्यावर गावाला आलेल्या अमेय ला विचित्र गोष्टी समोर यायला लागतात. त्याला कसली भीती वाटते आणि कोणत्या गोष्टी मुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला हे तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही नदी ही वेब सीरिज बघाल. अतिशय रोमांचित आणि तुम्हाला भयभीत करणारी ही वेब सीरिज बघताना तुमच्याही अंगावर काटा येईल ही वेब सीरिज म्हणजे भीतीचा आगडोंब पाहताना तुम्हीही घाबराल हे नक्कीच.
या वेब सीरिजची शूटिंग सिंधुदुर्ग जिल्यातील वालावल या गावी झाली आहे. त्याच स्थानिक कलाकारांनी ही काम केले आहे. दशावतार दादा राणे कोलस्कर हे ही या सीरिज मध्ये आपल्याला वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. यात प्रमुख भूमिका साकारणारा चेहरा म्हणजे सिद्धेश नागवेकर याने अनेक मालिका आणि वेब सीरिज मध्ये काम केले आहे.

नदी या वेब सीरिजला कोकण फिल्म फेस्टिवल मध्ये जवळ जवळ 5 अवॉर्ड मिळाले आहेत. या वेब सीरिजचे लिखाण नितीन पेडणेकर या लेखकांनी केले आहे. शिवाय हेच या सीरिजचे दिग्दर्शक आहेत तर सिनेमॅटोग्राफर किरण जाधव, एडिटर आदित्य सावंत हे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सीरिज मधील भीतीदायक म्युझिक हे अम्रित कपूर यांनी दिलेले आहे. एखादा भयपट तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी बॅकग्राऊंड संगीत सुद्धा त्याच तोडीचं हवं असतं. ह्या वेब सिरिजमधील बॅकग्राऊंड संगीत ऐकूनच तुम्हाला थरकाप होईल.
तुम्हाला सुद्धा भयपट गोष्टी पाहायला आवडत असतील तर ही सिरीज तुमच्यासाठी एक उत्तम मेजवानी आहे. ही सिरीज तुम्हाला विकेंड कॉफी चॅनलवर पाहायला मिळेल.