मुरली शर्मा हा जरी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असला तरी त्याने गोलमाल या बॉलिवूड सिनेमात ही काम केले आहे शिवाय अनेक बॉलिवूड मधील सुपरहिट चित्रपट मध्ये त्याने काम केले आहे. मे हु ना आणि दबंग, तीसमार खान, सिंघम रिटर्न्स अशा सिनेमात तुम्ही त्याला पाहिलेच असेल. मुरली याचा अभिनय इतका उत्कृष्ट असतो की त्याने केलेली कोणतीही भूमिका ही नेहमीच बाजी मारते. मग ती भूमिका विलेनची असो किंवा बापाची असो किंवा अन्य कुठलीही असो त्याचा अभिनय बघताना एक चांगला चित्रपट बघणायचा अनुभव येतो.
त्याने अनेक भाषेतील चित्रपट मध्ये काम केले आहे हिंदी, तमिल, तेलुगु, मराठी, मलयालम इत्यादी. पोलिसांच्या भूमिकेतील त्याचा नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही प्रकारचे रोल आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
मुरली शर्मा पत्नी
मुरली शर्मा हा चित्रपट सृष्टीमध्ये जरी प्रसिद्ध कलाकार असला तरीही तो आपले खाजगी आयुष्य हे नेहमी पडद्याआड ठेवतो. त्याला सोशल मीडियावर गाजावाजा करायला आवडत नाही. मुरली शर्मा याचे लग्न २००९ साली मराठी अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिच्या सोबत झाले आहे. अश्विनी काळसेकर हिने ही अनेक मराठी मालिका तसेच मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. बॉलिवूड मध्ये तिचा अभिनय नेहमीच चांगला पाहायला मिळतो.

तुम्हाला तिची ती मालिका अजूनही आठवते दूरदर्शन वर आलेली शांती खूप प्रसिद्ध मालिका होती. त्यानंतर सी आय डी, कसंम से या मालिकांमधून ती लोकांना जास्त आवडू लागली. तसेच तिने मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारखे हिंदू चित्रपट ही केले आहेत. कोणत्याही प्रकारची भूमिका असो ती अगदी उत्तमरित्या पार पाडते. फू बाई फू ह्या झी मराठी वाहिनीवर तिने प्रशिक्षक म्हणून स्वप्नील जोशी सोबत काम केलं होतं.
खूप कमी लोकांना हे माहीत आहे की अश्विनी काळसेकर मुरली शर्मा ह्याची पत्नी आहे. पाहायला गेले तर मुरली ह्याची ही दुसरी पत्नी आहे. पण तरीसुद्धा ते आपल्या संसारात खूप सुखी आहेत. ( हे सुध्दा वाचा : ह्या रिऍलिटी शोच्या जजला मिळणारे मानधन पाहून तुम्ही थक्क व्हाल )