हिंदू धर्मातील एक मोठे देवस्थान मानले जाणारे हे श्री महालक्ष्मीचे मंदिर मुंबईमध्ये आहे. जे लोक दैवि शक्तीवर खरोखर विश्वास ठेवतात त्यांना ही पोस्ट आवडेल. नवरात्री मध्ये या ठिकाणी अनेक ठिकाणं हून येणारे भक्तगण खूप गर्दी करतात. या मंदिराची निर्मिती सन 1831 मध्ये धाकजी दादाजी या नावाच्या एका हिंदू व्यापारी व्यक्तीने केली आहे. मंदिर बनवताना त्यावेळी अनेक अडचणी आपल्या दोन भागांना जोडणारी एक भिंत वारंवार ढासळत होती. याची बांधणी ब्रिटिश इंजिनिअरद्वारा केले जात होते आणि त्यांना सुद्धा कळत नव्हते की भिंत वारंवार का कोसळत होती.
यादरम्यान याच प्रोजेक्ट मध्ये काम करत असणारे चीप इंजिनिअर जे भारतीय होते त्यांच्या स्वप्नात लक्ष्मी मातेने येऊन दर्शन दिले आणि सांगितले की वरळी जवळच्या समुद्रामध्ये माझी मूर्ती आहे आणि खरोखर त्या ठिकाणी शोध घेतल्यावर महालक्ष्मी देवीची मूर्ती त्या लोकांना मिळाली. या घटनेने सगळ्यांच्याच डोळ्याचे पारणे फिटेल आणि ज्या ठिकाणी ही मूर्ती मिळाली त्या ठिकाणी या चीप इंजिनिअर ने एक महालक्ष्मीचे मंदिर बांधले आणि हे सगळं झाल्यानंतर महालक्ष्मी देवीच्या मोठ्या मंदिराचे बांधकाम ही सुरळीत पने पार पडले.
या मंदिरात देवी लक्ष्मी, कालि माता आणि सरस्वती देवी या देवींच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. या मंदिरात जायचे असेल तर ते सकाळी सहा वाजता लोकांना दर्शन घेण्यासाठी उघडते तर रात्री दहा वाजेपर्यंत उघडे असते. इथे असणाऱ्या तीनही देवींच्या चेहऱ्यावर सोन्याचे मुकुट आहे आणि या मंदिरात असणारी महालक्ष्मी देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. तुम्हाला खरोखर महालक्ष्मी देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर रात्री 9.30 च्या सुमारास जा.
या वेळी देवी महालक्ष्मी च्या मूर्तीवर असणारे आवरण बाजूला काढले जाते आणि 15 मिनिटे भक्तांना दर्शन घेण्यासाठी देवीचे आवरण तसेच ठेवले जाते. सकाळी मंदिर उघडल्यावर महालक्ष्मी देवीला पहिल्यांदा अभिषेक घातला जातो. तुम्ही जर मातेचे भक्त आहात तर वेळात वेळ काढून एकदा ह्या भक्ती स्थळाला नक्कीच भेट द्या.