Home करमणूक दृष्ट लागण्या जोगे सारे या एका गाण्याने सर्वांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री सध्या का आपल्याला दिसत नाही

दृष्ट लागण्या जोगे सारे या एका गाण्याने सर्वांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री सध्या का आपल्याला दिसत नाही

by Patiljee
670 views

हे गाणं आहे अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस हे दोन मराठी कलाकार आणि सिनेमा कोणता आहे बरं “माझं घर माझा संसार” आल ना लक्षात. ज्या ज्या मुलामुलींचे नवीन लग्न नवीन आहे यांच्यासाठी हे गाणे म्हणजे जणू पर्वणीच..! कारण या गाण्यात तितकेच छान असे बोल म्हटलेले आहेत जर आपल्याला खरंच भारावून जातात.

अजिंक्य देव मुग्धा चिटणीस हे दोन कलाकार जेव्हा ट्रेन मध्ये हे गाणं बोलत असतात तेव्हा त्यांच्यातील ते रोमँटिक क्षण अजूनही आठवतात. 1986 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा तिचे वय 21 होते आणि त्यातील हे गाणं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांनी या दोन गायकांनी गायले होते. त्या अभिनेत्रीचा हा जरी पहिला सिनेमा असला तरी तिने या सिनेमात खूप छान काम केले आहे.

ती अभिनेत्री यापुढे जाऊन चित्रपट का करू शकली नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण त्याचे कारण मात्र कोणाला माहित नसेल. ती एक कॅन्सर पिढीत अभिनेत्री होती आणि या कॅन्सर सारख्या आजाराशी लढता लढता तिने वयाच्या 31 व्या वर्षी म्हणजे 10 एप्रिल 1996 साली जगाचा निरोप घेतला. तिचे लग्न उमेश घोडके यांच्यासोबत झालं होत आणि ज्यावेळी तिने अखेरचा श्वास घेतला त्यावेळी तिला 5 वर्षाची एक मुलगी होती. मुग्धाच्या मृत्यूनंतर तिची पाच वर्षाची मुलगी ईशा आपल्या आज्जी आजोबांसोबत मुंबईत राहू लागली. पुढे ती वडिलांसोबत अमेरिकेत गेली.

ती फक्त एक अभिनेत्री नव्हती तर ती उत्कृष्ट अशी कथनकार होती तिने भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात 500 हून अधिक कार्यक्रम केले होते. तिचा हा पहिला आणि शेवटचा सिनेमा असला तरीही अजूनही ती लोकांच्या आठवणीत आहे. या गाण्याने तिला स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे आणि जेव्हा जेव्हा हे गाणे टीव्ही वर दिसेल तेव्हा तो या जगात आहे असाचं भास होईल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल