भारतात अनेक असे नामी व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांनी असंख्य डिग्री प्राप्त करून आपले एक वेगळं नाव निर्माण केलं आहे. पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का? की भारतात सर्वात जास्त शिक्षण घेतलेला व्यक्ती कोण आहे? त्यांच्याकडे एकूण किती डिग्री आहेत? ह्याचे उत्तर ऐकून तुमची छाती सुद्धा अभिमानाने भरून येईल. कारण भारतात सर्वाधिक शिक्षण घेतलेला माणूस एक मराठमोळा व्यक्ती आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात एवढ्या डिग्री संपादित केल्या आहेत की ह्याच डिग्री मुळे त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.
मोस्ट क्वालिफाइड इंडियन म्हणजेच भारतातील सर्वाधिक शिक्षण घेतलेला व्यक्ती म्हणून त्यांना पदवी दिली आहे. ह्या व्यक्तीचे नाव श्रीकांत जिचकर आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५४ रोजी नागपूर मध्ये झाला. कॉलेज मध्ये असल्यापासून ते राजनेता होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ते विधानसभा निवडणूक जिंकले होते. पुढे जाऊन लोकसभेत सुद्धा त्यांनी बाजी मारून विजयश्री खेचून आणला होता. आणि लोकसभेत मंत्री सुद्धा झाले होते.
तुम्हाला वाचून धक्का बसेल कारण श्रीकांत ह्यांनी ४२ विद्यापीठातून शिक्षण घेऊन २० डिग्री प्राप्त केल्या होत्या. त्यांच्याकडे MBA, LLB, MBBS, PHD पदव्या होत्या. त्यांनी अनेक विषयात एम ए सुद्धा केला होता. त्यांनी एका विषयात गोल्ड मेडल सुद्धा प्राप्त केलं होतं. पुढे जाऊन त्यांनी यूपीएससी सुद्धा पास करून आयपीएस अधिकारी बनले होते. पण काहीच वेळात त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देऊन आयएस अधिकारी बनले. पण पुढे चार महिन्यात ह्या पदाचा पण राजीनामा दिला.

त्यांनी आपल्या घरात स्वतःची लाईबरी सुरू केली होती. त्यांच्या संचात ५० हजार पुस्तके होती. असा कोणता विषय नव्हता ज्या विषयावर ते बोलू शकत नव्हते. अश्या ह्या अजरामर व्यक्तिमत्त्वावर आजवर सिनेमा का नाही बनला? ह्याचे नवल वाटते. वयाच्या ५० व्या वर्षात एका अपघातात २ जून २००४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांनी आपल्या ह्या अल्प आयुष्यात एवढं काय काय करून ठेवलं आहे मी त्याची सर कुणाला पुढे जाऊन करता आली नाही.