२०२० मध्ये भाईजान सलमान खानच्या येणाऱ्या सिनेमा बद्दल आतापासूनच प्रेशकांच्या मनात अनेक प्रतिक्रिया आहेत. या सिनेमात सलमानचा एक वेगळाच अँक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. प्रत्येकजण या सिनेमाबद्दल बोलताना दिसतो आहे तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या सिनेमात किती आणि कोणते खलनायक आहेत जे ह्या सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांसमोर ठेवणार आहेत
जैकी श्रॉफ
सलमान खानच्या या सिनेमात जैकी श्रॉफ हा आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे व्हीलेनच्या रुपात तसेही यागोदर ही जैकी श्रॉफ याने कितीतरी सिनेमात व्हिलेन चे काम केलेलं आहे. आताच प्रभास सोबत साहो चित्रपटात त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. त्यांचा भारदस्त आवाज आणि सोबत अभिनयाची जोड त्यामुळे प्रेक्षकांना एक अनोखे रूप नक्कीच पाहायला मिळणार आहे.
रणदीप हुड्डा
रणदीप हुड्डा हा आपल्या चांगल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. राधे सिनेमात सुद्धा रणदीप आपल्याला एका व्हीलेन च्या रुपात पाहायला मिळणार आहे. यापासून तुम्ही या सिनेमाचा अंदाज लावू शकता की हा सिनेमा किती जबरदस्त अँक्शन ने भरलेला असणार आहे.
भारत
साऊथ सिनेमातील सुपरस्टार अभिनेता जा भारत सलमान चां सिनेमा राधे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात एका दमदार भूमिकेत हा खलनायक दिसणार आहे.
वीरेंद्र सिंह घुम्मन
या सिनेमातील शेवटचा आणि चौथा सगळ्यात खतरनाक व्हीलेन वीरेंद्र सिंह हा सगळ्यांना बॉडी बिल्डिंग च्या नावाने माहीतच आहे. या दमदार अभिनेत्याचा रोल ही दमदार असणार आहे. शिवाय या सिनेमात तुम्हाला भरपूर ऍक्शन ही पाहायला मिळणार आहे.

तुम्हालाही भाईजान च्या ह्या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा.