मित्रांनो साऊथ मधल्या या अभिनेत्री दिसायला खूप सुंदर आणि गोंडस आहेत कोणालाही बघताक्षणी आवडतील अशाच आहेच. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये भरलेला अभिनयाचा किडा आपल्याला विविध सिनेमातून पाहायला मिळतो. कधी कधी तर आपल्याला ही अभिनेत्री आवडते म्हणून आपण तिचा सिनेमा वारंवार पाहत असतो तर मग वाचा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य केले आहे.
साई पल्लवी
या अभिनेत्रीचा अभिनय उत्कृष्ट असतो त्याचबरोबर तिचे देखणे सौदर्य पहाण्याजोगे असते तिने तमिळ, तेलगू, आणि मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषेतील च चित्रपटामध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीने पाहिला तमिळ सिनेमा 2018 मध्ये दिया हा केला होता. 2015 मध्ये तिने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती तो सिनेमा आहे मल्याळम भाषेत प्रेमम या नावाचा. त्याच बरोबर ती उकृष्ट डान्स ही करते यासाठी तिने कोणतेही क्लास जॉइंड केले नाहीत तिच्या आई सारखे डान्स तिला करायचे होते त्यामुळे ती शाळेतील अनेक प्रोग्राम मध्ये भाग घेत होती.

अनुपमा
अनुपमा या अभिनेत्रीने प्रेमम या सिनेमातून साई पल्लवी सोबतच आपले पहिले पाऊल या फिल्म इंडस्ट्रीमध्ये रोवले आणि आज ती या इंडस्ट्रीमध्ये आपले अव्वल स्थान सिद्ध केले आहे. या अभिनेत्रीने ही तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड सिनेमात काम केले आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव कोणालाही वेड लावणारे आहेत. भारताचा जलतगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सोबत तिचे नाव बऱ्याचदा जोडले गेले आहे.

कीर्ती सुरेश
या अभिनेत्री ने ही तमिळ, मल्याळम आणि तेलगू या तीनही भाषेत सिनेमे केले आहेत. महानती या सिनेमासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या चेहऱ्यावरून सालस भाव आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते अशी ही अभिनेत्री कीर्ती सुरेश आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून आहे.

साऊथ मध्ये काम करणाऱ्या दुसऱ्याही अनेक अभिनेत्री तुम्हाला आवडत असतीलच. तुमच्या आवडत्या अभिनेत्रीचे नाव आम्हाला कमेंट द्वारें कळवा.