मित्रानो आपण लहान पणापासून पुस्तकातून शिकत आलेलो आहोत की मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, पण ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का की श्रीलंकेचा ही राष्ट्रीय पक्षी मोरच आहे. मोराला संस्कृत मध्ये मयुर म्हणतात, दिसायला सर्वात सुंदर असा हा पक्षी त्यांचे पंख तर आपल्याला नेहमीच आकर्षित करीत असतात. याला पक्षांचा राजा असे म्हणतात. खर तर सगळ्यांनाच मोर हा प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. आपल्यातील काही जणांनी त्याला नॅशनल पार्क मध्ये ही पाहिले असेल पण काही ठिकाणी अशी आहेत की जिथे तुम्हाला मोर प्रत्यक्षात पाहायला मिळतात.

दिसायला हा पक्षी इतर पक्षांपेक्षा थोडा वेगळाच कारण त्याची लांब सडक पंख आणि तो पिसारा फुलला की पाहतच रहावं असं वाटणार ते रूप, निळ्या रंगाची मान, डोक्यावर तुरा हे त्याचे आकर्षित करणारे भाग आहेत. मोराला उंच ठिकाणी बसायला खूप जास्त आवडते, असं म्हणतात की मोर जेव्हा आपल्या पायांकडे पाहतो तेव्हा तो रडत असतो कारण त्याच्या संपूर्ण शरीराच्या तुलनेत त्याचे पाय कुरूप असतात. भारत सरकारने मोर या पक्षाला संपूर्ण संरक्षण दिले आहे. त्यामुळे मोराच्या शिकारीवर सध्या तरी प्रतिबंध आहे. मोर हा नेहमी ग्रुप करून राहत असतो.
भारतातील सर्व भागात हा पक्षी पहिला जाती पण जास्तीत जास्त मोर हा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या भागात पहिला जातो. तसेच परदेशात ही मोर पहिला जातो पण भारतात याची सर्वात सुंदर प्रजाती आपल्याला पाहायला मिळते. मोराचा आवाज लांबूनही तुम्हाला ऐकू येऊ शकतो इतका जास्त जोरात असतो. हा जरी पक्षी असला तरीही त्याला जास्त उंच उडता येत नाही. त्याला जास्त करून चालायला आवडते. मोराचे 150 हून अधिक पंख असतात त्यावर रंगीबेरंगी चंद्राकृती आकार पाहायला मिळतो.
पावसाचे दिवस त्याला खूप जास्त आवडत असतात. त्यामुळे पावसात आपले पंख पसरून नाचायला त्याला खूप आवडते आणि हा देखावा पहणाऱ्याचे डोळे ही भारावून जातात. मोराचे पंख इतके कोमल असतात की जसे काही मलमलचा कपडा आहे. मोराचा जीवनाचा कालावधी कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 25 वर्ष इतका असतो. त्याला खायला धान्य आणि किडे तसेच भाज्या खायला आवडतात. त्याची ऐकण्याची क्षमता खूप जास्त असते थोड जरी खुट्ट झालं तरी त्याच्या कांनाना ऐकू गेल्याशिवाय राहणार नाही. मोर हा पुलिंग असतो तर मोरणी ही स्त्रीलिंगी असतें. पण मोरनी मोरा ईतकी दिसायला सुंदर नसते तिचा रंग सुधा भुरकट असा असतो.

मोराचे हे अद्भुत सौदर्य पाहून त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. 26 जानेवारी 1963 हा तो दिवस होय. हिंदू धर्मात मोराला खूप महत्त्व आहे कारण देव श्री कृष्ण यांनी आपल्या माथ्यावर मोराचे पिस धारण केले आहे. आणि याशिवाय कार्तिक देवाचे वाहन ही मोर आहे. प्रत्येक वर्षाला याला नवीन पंख येतात कारण जुने पंख हा पक्षी त्यागतो.