भारतीय सिने सृष्टीतील एक नवीन चेहरा म्हणून मौनी राय हीची ओळख आहे. पण सध्या संपूर्ण जगात लॉक डाऊन असल्याने ती सुद्धा अबू धाबी मध्ये अडकली आहे. एका शूटिंगसाठी ती अबू धाबी ला गेली होती पण काही दिवस फिरण्यासाठी तिने आपले शेड्युल वाढवले होते. त्याच काळात भारतीय सरकारने लॉक डाऊन ची घोषणा केली. सर्व फ्लाइट्स सुद्धा बंद असल्याने तिचे भारतात येणे कठीण होऊन बसलं आहे. सध्या ती भारताला आणि तिच्या घराला मिस करतेय. लवकरात लवकर भारतात यायचे आहे असेही तिने एका लाईव्ह सेशन मध्ये म्हटले होते.
शूट संपल्यानंतर तिचे दुसरे शूट १५ एप्रिल रोजी सुरू होणार होतं. तिच्याकडे बराच वेळ असल्या करणारे तिने काही वेळ अबू धाबी मध्ये दोन आठवडे अजुन थांबण्याचा निर्णय घेतला होता. मौनी आणि तिची बहीण सुद्धा तिच्यासोबत आहे. हवं तेवढं कपडे सुद्धा तिने सोबत आणले नव्हते म्हणून तिने चिंता व्यक्त केली आहे. पण तरीही तिला ह्या गोष्टीचा आनंद आहे मी घरी नसली तरी माझ्या आई जवळ माझा भाऊ आहे. त्यामुळे मला कशाची काळजी नाहीये.

मौनी रॉय चे घर बिहार मध्ये स्थित आहे. तिने आपल्या लाईव्ह सेशन मध्ये बोलताना सांगितले की लवकरात लवकर मला भारतात यायचे आहे. सर्व गोष्टी लवकरात लवकर पूर्वत होतील आणि संपूर्ण जग पुन्हा नव्या जोमात चालू होईल. आपण जे घरात बसलो आहोत ते एक प्रकारची लढाई जिंकण्यासाठीच आपण बसून आहोत. त्यामुळे योग्य वेळ आली की सर्व गोष्टी ठीक होऊन जातील. असेही ती म्हणाली.
मौनी ने आपल्या करीयर ची सुरुवात छोट्या पडद्यावरून म्हणजेच क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेतून केली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकेत आणि रिऍलिटी शो मध्ये कामे केली होती. बॉलीवुड मध्ये अक्षय कुमार सोबत गोल्ड ह्या सिनेमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यांनतर रोमिओ अकबर वॉल्टर आणि मेड इन चायना ह्या सिनेमात सुद्धा तिने मुख्य भूमिका केली होती
येणाऱ्या काही दिवसात तिचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. मोगुल आणि ब्रह्मास्त्र ह्या सिनेमात ती आपल्याला दिसणार आहे. ब्रह्मास्त्र मध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट सोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसेल.