Home करमणूक मोहन गोखले ह्यांची कन्या आहे ही प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री

मोहन गोखले ह्यांची कन्या आहे ही प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री

by Patiljee
725 views

मोहन गोखले हे नाव मराठी सिने सृष्टीला काही नवीन नाही. आपल्या अजरामर अभिनयाने त्यांनी अनेक सिनेमे, नाटके आणि मालिका गाजवल्या आहेत. त्यांचा जन्म १९५४ मध्ये पुण्यात झाला होता. त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्रातील मिस्टर योगी, अल्पविराम आणि बायबल की कहानिया मध्ये काम केलं आहे. ह्याच बरोबर माफीचा साक्षीदार, बन्या बापू, ठकास महाठक, हेच माझे माहेर, आदत से मजबूर, होली, हिरो हिरालाल, मोहन जोशी हाजिर हो, स्पर्श, मिर्च मसाला, द रॉ मँगो ह्या चित्रपटात सुद्धा काम केलं आहे. तुम्ही जुने सिनेमे पाहत असाल तर नक्कीच मोहन सरांचे चाहते असणार ह्यात काही शंका नाही. मराठी मध्ये दिग्गज विक्रम गोखले हे त्यांचे बंधू आहेत.

जगाला आपल्या अभिनयाने सामावून घेणारा हा अभिनेता १९९९ मध्ये वयाच्या अवघ्या ४५ वर्षात आपल्याला सोडून देवाघरी निघून गेला. हृदयिकाराच्या झटक्याने त्यांचां दिल्लीमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचे नाव शुभांगी गोखले आणि मुलीचे नाव सखी गोखले आहे. शुभांगी ह्यांनी सुद्धा हे राम, क्षणभर विश्रांती, दसेहरा, अग बाई अरेच्चा, मोक्ष, बोक्या सात बंडे ह्या सारख्या चित्रपटात कामे केली आहेत. सर्वांची आवडती मालिका श्रीयुत गंगाधर टिपरे ह्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. याचबरोबर काहे दिया परदेस, लापतागांज, एका लग्नाची तिसरी गोष्ट,कोशिश, केसर ह्या सारख्या मालिकांमध्ये कामे केली आहेत.

मोहन गोखले आणि शुभांगी गोखले ह्यांची कन्या सखी गोखले हिला तुम्ही झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी ह्या मालिकेमध्ये पाहिलेच असेल. तिचा जन्म २७ जुलै १९९३ मध्ये झाला आहे. तिने आपले शालेय शिक्षण सह्याद्री स्कूल तर डिग्री रुपारेल कॉलेजमधून घेतली आहे. शामक दावर ह्या प्रसिद्ध कोरियोग्रफार तिने नृत्याचे धडे घेतले आहेत. बॉलीवुड मध्ये तिने २०१३ साली रंग्रेझ ह्या सिनेमातून पदार्पण केलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली दिलं दोस्ती दुनियादारी ह्या मालिकेमधून रेश्मा इनामदार म्हणून.

ह्या मालिकेनंतर अमर फोटो स्टुडिओ ह्या नाटकात सुद्धा ते प्रेक्षकांच्या भेटीला आली. पिंपळ ह्या मराठी सिनेमातसुद्धा तिने काम केलं आहे. सूर्वत जोशी सोबत तिने ११ एप्रिल २०१९ मध्ये लग्न केलं. पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की सखी मोहन गोखले ह्यांची कन्या आहे. तुम्हालाही हे माहीत होत का नव्हतं? आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल