Home बातमी मोदींच्या ५ तारखेच्या घोषणेवर अनेक जणांचा विरोध तुम्हाला काय वाटते?

मोदींच्या ५ तारखेच्या घोषणेवर अनेक जणांचा विरोध तुम्हाला काय वाटते?

by Patiljee
249 views

सध्या भारतात मोदींनी लॉक डाऊनची घोषणा केली आहे. आज जवळ जवळ ११ दिवस झाले आहेत पण तरीही काही लोक विनाकारण रस्त्यावर निघताना पाहायला मिळत आहेत, तरीही आपण सर्वांनी मिळून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी घरात बसणे योग्य आहे. हेच आपल्यासाठी महत्वाचे आहे. मोदींनी पहिला लॉक डाऊन २२ तारखेला सांगितलं होता आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद ही दिला होता.

त्याच संध्याकाळी ५ वाजता सर्व जनतेला त्यांनी असे आवाहन केले होते की तुम्ही गॅलरीत किंवा खिडकीत उभे राहून टाळ्या किंवा थाळी वाजवून जे डॉक्टर, नर्स, पोलीस जे लोक आपल्यासाठी या काळात लढा देत आहेत त्यांच्यासाठी हे करायचे होते मोदींनी हे आवाहन लोकांनी अगदी उत्तमरित्या पार पडले.

त्यानंतर इतक्या दिवसांनी मोदींनी आणखी एक महत्त्वाची घोषणा या भारतीय जनतेपुढे मांडली आहे. या घोषणे मागचा त्यांचा उद्देश असा आहे की आपण सर्व एकत्र आहोत आणि या संकटावर मात करण्यासाठी खंबीर आहेत हे दाखवून द्या त्यासाठी त्यांनी 5 तारीख निवडली आहे.

या दिवशी आपण सर्वांनी म्हणजेच या देशातील सर्व जनतेने रात्री नऊ वाजता आपल्या घरातील सर्व लाईट बंद करायच्या आहेत आणि गॅलरीत किंवा दरवाजा मध्ये उभे राहून हातात बॅटरी, दिवा, मोबाईल टॉर्च असे काहीतरी घेऊन उभे राहायचे आहे. जवळ जवळ 9 मिनिटे त्यामुळे आपल्या मधील एकी दिसून येईल. पण मोदींच्या या घोषणेला काही ठिकाणी विरोध आहे चक्क इलेक्ट्रिसिटी बोर्डने सुद्धा या निर्णयावर असमर्थता दर्शवली आहे.

त्यांचं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणत देशभरातून दिवे बंद केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो तर काही लोकांचे म्हणणे आहे की नुसत्या लाईट घालवून कसला परिणाम होणार आहे घरातील बाकी उपकरणे तर चालूच असतील ना? तर मित्रानो तुम्हाला काय वाटते आहे तुम्ही दिवा लावणार आहात की नाही?

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल