हा गोंडस असा चेहरा कुणाला माहीत नसेल तर नवलच. मिथिला पालकर ही मराठमोळी मुलगी असली तरी तिने आपल्या अभिनयाने हिंदी क्षेत्रात आपले नाव आपल्या अभिनयाने मोठे केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तिचा आजवरचा प्रवास कसा होता? चला तर मग जाणून घेऊया.
११ मार्च २०१६ मध्ये तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ह्या व्हिडिओ मध्ये तिने घरातला प्लास्टीक ग्लास घेऊन कप साँग ही चाल तुरतुरु हे गाणे गायले होते. हे गाणे तेव्हा एवढे वायरल झाले होते की प्रत्येक मराठी माणसापर्यंत ते पोहोचले होते. खऱ्या अर्थाने तिला इथूनच मनोरंजक क्षेत्रात ओळख निर्माण झाली होती. तिचा जन्म मुंबई मधेच १२ जानेवारी १९९३ मध्ये झाला. मुंबईतच ती लहानाची मोठी झाली. मिठीबाई कॉलेज मधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. ती दादर मध्ये आपल्या आजी आजोबांकडे राहते.

तिने आपले पदार्पण २०१४ मध्ये आलेल्या माझा हनिमून ह्या मराठी शॉर्ट फिल्म मधून केले होते. ह्यानंतर तिने तिचा बॉलिवूड पदार्पण इमरान खान आणि कंगना राणावत सोबत कट्टी बट्टी ह्या सिनेमात केला होता. ह्यात तिने इमरानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ह्या सिनेमाला हवं तेवढं यश मिळालं नाही पण हा गोड चेहरा लोकांना आवडला होता. ह्यानंतर ती टाटा टी, झोमाटो, मॅगी ह्यासारख्या कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली.
त्यानंतर २०१६ मध्ये बिंदास वाहिनीवरील गर्ल इन सिटी ह्या वेब सिरीज मध्ये तिने काम केले. ही वेब सिरीज लोकांना खूप जास्त आवडली. त्यांनतर २०१७ मध्ये लिटल थिंग्स ह्या वेब सिरीज मध्ये तिने काम केले. ह्या वेब सीरिजने लोकांना खूप जास्त प्रभावित केले. म्हणूनच नेटफलिक्सने ह्याचे हक्क विकत घेऊन ह्याच वेब सीरिजचा दुसरा भाग नेटफलिक्सवर प्रदर्शित केला.
अमेय वाघ आणि मिथिला पालकर ही फ्रेश जोडी मुरांबा ह्या मराठी सिनेमात दिसली होती. ह्यानंतर मिथिलाला बॉलीवुड मध्ये पहिला लीड रोल मिळाला तो कारवा ह्या सिनेमातून. ह्या सिनेमात साऊथ मधील प्रसिध्द अभिनेता दुलकर सलमान आणि इरफान खान सोबत ती आपल्याला दिसली होती.
फोर्ब्स अंडर ३० मध्ये सुद्धा तिचे नाव २०१८ मध्ये आले होते. ह्यानंतर २०१९ मध्ये नेटफलिक्सवरील चोपस्टिक ह्या सिनेमात ती अभय देओल सोबत दिसली होती. तिने टुंनी की कहानी, देख बहन, आज रंग हैं ह्या सारख्या नाटकात सुद्धा कामे केली आहेत. तिला बेस्ट कॉमेडी अभिनेत्री आयरील अवॉर्ड २०१९, उत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स चॉइस शॉर्ट अँड सिरीज अवॉर्ड, उत्कृष्ट अभिनेत्री वेब सिरीज २०१९ अवॉर्ड तिला मिळाले आहेत.
येणाऱ्या काही दिवसात तिचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. लवकरच ती आपल्याला नव्या रूपात पाहायला मिळेल. ह्या मराठमोळ्या मुलीसाठी, तिच्या कामगिरीसाठी तुम्ही काय मत द्याल? नक्की कळवा.