मिस वर्ल्ड स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. शनिवारी सुद्धा मिस वर्ल्ड २०१९ स्पर्धेचे मोठ्या दिमाखात सोहळा पार पडला. जमैकाच्या टोनी एन सिंह ने मिस वर्ल्ड स्पर्धा आपल्या नावावर केली. भारताचे प्रतिनधीत्व करणाऱ्या सुमन राव ही सुद्धा तिसऱ्या स्थानावर राहिली तर दुसऱ्या स्थानी फ्रान्सच्या ओफेली मेजिनो फर्स्ट हिने आपले स्थान पक्क केलं. स्पर्धा जिंकणाऱ्या टोनी एन सिंह हिला भविष्यात डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. यासोबतच तिला डान्स आणि प्रवास करण्याची खूप आवड आहे. टोनी ह्या आधी २३ व्या वर्षातच मिस जमैका वर्ल्ड ही स्पर्धा सुद्धा जिंकली आहे.
भारतीय सुमन राव हिने सुद्धा तिसरे स्थान पटकावून भारताच्या आशा ह्या स्पर्धेत जिवंत ठेवल्या होत्या. सुमन हीचा जन्म राजस्थान मध्ये २३ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला.
ती पेशाने सी ए आहे. याआधी तिने फेमिना मिस राजस्थान हा किताब आपल्या नावावर केला आहे. आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व तिने मिस इंडिया स्पर्धेत सुद्धा केलं होतं.

सुमन चे विजेतेपद काही अल्पशा गोष्टी मुले जरी हुकले असले तरी तिने भारतीयांची मान गर्वाने उंचावेल अशी कामगिरी नक्कीच केली आहे. संपूर्ण भारतातून तिला शुभेच्छा मिळत आहेत. एका इंटरव्ह्यूमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की तिला बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे आणि त्यासाठी ती प्रयत्न करत आहे आणि जरी मी ह्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिली तरी खूप सारा अनुभव मी इथून नक्कीच घेऊन जात आहे.