आज तिचं लग्न, खरं तर मी नाखूशच होतो पण आमच्यात प्रेम वैगेरे असे काहीच नव्हते. हा माझ्या बाजूने नक्कीच ते मनापासून केलेलं प्रेम होत पण तिच्या बाजूने मी फक्त तिला पाच वर्ष अभ्यासात मदत करून देणारा मुलगाच होतो. कधी कधी असे वाटायचं की ही जाणीवपूर्वक माझा अभ्यासासाठी वापर करतेय पण तिची सोबत, तिचे बोलणे हेच माझ्यासाठी खूप होत. इयत्ता सातवी पासून ते बारावी पर्यंत आम्ही सोबत होतो. सर्वांना असेच वाटायचं की आमच्यात प्रेम वैगेरे आहे पण असे काहीच नव्हते.
एकदा तर आमच्या पाटील सरांनी मला क्लास बाहेर नेले आणि म्हटले अतुल तुम्हा दोघांचं जास्त होतेय आता. त्यामुळे तुमच्यात काही असेल तर ते वर्गाबाहेर असूद्या. पण त्यांना कुठ काही ठाऊक होत की आमच्यात फक्त मैत्री आहे. तिला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमा प्रमाणे माझ्या आजूबाजूला गिटार घेऊन वादक वाजवू लागले होते. तिची ती गेटवरून झालेली पहिलीच एन्ट्री माझे हृदय घायाळ करून गेली होती. मी तिच्याकडे एकटक पाहत बसलो कारण मला माहीत होत की हिला मी किंवा मला ही ओळखत नाही. त्यामुळे असे का बघतोय असे ती मला विचारणार सुद्धा नाही.
काही दिवसांनी आमच्यात मैत्री झाली, झाली म्हणण्यापेक्षा मीच ती केली म्हटलेलं योग्य असेल. आज आमच्या मैत्रीला एवढी वर्ष झाली पण कधीच माझ्या मनातील भावना मी तिला सांगू शकलो नाही. बारावीला असताना मी माझ्या मनातले भाव तिच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला खरा पण ते कधीच शक्य झालं नाही. कॉलेज संपायला सहा महिने असताना मी तिला अखेर माझ्या मनातली भावना सांगून टाकल्या. मला पूर्ण विश्वास होता एवढ्या वर्षाची मैत्री आहे त्यामुळे नक्कीच ती हो म्हणेल.
पण अगदी ह्या उलट झाले. ती माझ्यावर खूप हसली खूप जास्त हसली आणि मला म्हटली येडा बिडा झालास का रे अतुल? मी तुझ्याशी चांगलं बोलले तर त्याला तू प्रेम समजले का? अरे तू कुठे मी कुठे? माझे राहणीमान बघ तुझे राहणीमान बघ, तू गरीब मी श्रीमंत? कसा मेल होणार आपला? आणि महत्त्वाचे म्हणजे मला तुझ्या सारख्या गरीब मुळाशी लग्न नाही करायचं मला श्रीमंत मुळाशी लग्न करून त्याची रानी बनून राहायचं आहे.
तिच्या ह्या शब्दांनी माझ्या ह्रुदयात खोलवर प्रहार केला होता. पण मी सर्व दुःख विसरून स्वतःची लाईफ चांगली करण्यात व्यस्त झालो. आज बऱ्याच वर्षांनी तिच्या लग्नाचे आमंत्रण आलं होत म्हणून मलाही तिच्या स्वप्नातला राजकुमार बघायचा होता. मी स्टेजवर गिफ्ट देण्यासाठी चढलो आणि तिला हाथ मिळवला. माझ्या येण्याने ती नक्कीच खुश दिसत तर नव्हती पण तरीही उगाचच चेहऱ्यावर हसू दाखवत होती. पण मी मात्र चांगल्या मनाने तिला शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो.
लग्न मंडपात खूप गरम होतोय म्हणून तिच्या नवऱ्याने फेटा बाजूला काढला तेव्हा मात्र मला हसू आलं. तिच्या नवऱ्याची टक्कल होती. हसू त्या बिचाऱ्या नवऱ्याचे आले नाही कारण टक्कल असणे काही गुन्हा नाही पण हसू तर तिचे आले की तिला नेहमीच अशी इच्छा होती की माझ्या नवऱ्याचे केस धूम मधील जॉन अब्राहम सारखे लांबसडक असावे. पण इथे हा नवरा श्रीमंत तर होताच पण तिची ईच्छा केसांची पूर्ण करणारा नव्हता. तिचे आयुष्य तिला लख लाभो म्हणून मीही जास्त काही न बोलता फक्त हसलो आणि मंडपातून बाहेर आलो. एव्हाना तिने मला हसताना पाहिले होतेच.
म्हणून तिला अतिशय मेल्याहून मेल्यासारखे झाले. कारण श्रीमंत मुलासोबत लग्न करायच्या तिच्या इच्छेमुळे तिने हे लग्न मान्य केले होते कारण नवरा मुलगा सरकारी कर्मचारी होता. पण शेवटी आता पुढील आयुष्य तिचे आहे. तिने योग्य निर्णय घेऊनच सर्व गोष्टी केल्या असणार.
ह्या कथेवरून तुम्ही काय बोध घेतलात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण प्रत्येकाच्या मनात कथा वाचताना तिच्यासारखी तुमचीही कुणी मैत्रीण असेल जी नजरेसमोर आली असेलच.
ही कथा पण वाचा पती पत्नी और बॉस
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)