मित्रांनो या जगात कोणीही असा व्यक्ती आपल्याला सापडणार नाही तो सदा सर्वकाळ सुखी आणि खुश असेल त्याला प्रत्येक वेळी काही ना काही नैराश्य आलेले असते. त्यामुळे तुमच्या मनात ही भावना नेहमीच येते की मी तर कोणाचे वाईट केलेले नाही किंवा वाईट बघितले नाही तरी माझ्याच बाबतीत असे वाईट का होत आहे. चांगले कर्म नेहमीच करतो शिवाय गरजवंताला मदत आणि देवाची ही नित्य पूजा करतो. इतकं सगळं चांगलं करूनही माझ्याच बाबतीत असे वाईट का घडते असे तुम्हाला ही नेहमी वाटतं असेल.
काही लोक तर या समजात राहून खूप लबाडी करतात खोटं बोलून पैसा कमावतात हिंसा, चोरी असे कितीतरी पाप करूनही ती आज खूप सुखी आहेत असे आपल्याला नेहमीच वाटत असते. ह्या अशा काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात त्या बद्दल तुम्ही कधी कधी स्वतःची सांत्वना करता म्हणजे नशिबाला दोष देता किंवा देवाच्याच मनात हे असेल म्हणून तुम्ही गप्प बसता पण हे योग्य नाही.
पण यापुढे जाऊन तुम्ही विचार करा हे कर्म युग आहे या जगात तुम्ही जसे कर्म कराल मग ते चांगले असो किंवा वाईट त्याचे फळ तुम्हाला मिळते. तर तुम्हाला वाटेल मी काहीच वाईट असे वागलो नाही की पाप ही केले नाही पण कधी कधी तुमच्या हातून नक्कीच अशा काही गोष्टी घडत असतात ज्या तुमच्या दृष्टीने वाईट नसतील पण त्या वाईट आहेत. आणि अशा वाईट गोष्टींचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते.
ज्या प्रमाणे सोना हा खूप प्रक्रिया केल्यानंतर चमकतो आणि त्यानंतरच त्याला अधिक मूल्य प्राप्त होते असेच मनुष्याचे आहे त्याला जर चांगले दिवस मिळावेत शिवाय यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर त्याला ही हे सहज मिळत नाही त्यासाठी कठोर परिश्रम करायलाच हवेत. त्याला त्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि या समस्यांना सामोरे जाता जाता तो निडर आणि कणखर होतो आणि पुढे जाऊन तो नक्कीच यशस्वी होतो.
यशाचा कोणताच शॉर्ट कट नसतो. एवढे आपण नेहमीच लक्षात घ्यावे. ह्या जगात मीच वाईट आहे,मलाच देवाने सर्व त्रास दिले आहेत, आजूबाजूचे किती आनंदी असतात, हसत असतात मग मीच का असा ज्याला नेहमी नैराश्य असते? आहे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की समोरचा हसत जरी असला तरी त्यांच्या अंतरमनात काय चाललं आहे? त्यालाही दुःख आहेच पण तो दाखवत नाही. ते दुःख स्वतः पुरते मर्यादित ठेवतो आणि आयुष्यात पुढे चालला आहे.
आपणही अगदी असेच केले पाहिजे. आपला त्रास आपल्याला आपणच तो सहन करून त्याच्यावर मात केली पाहिजे.