तुम्हाला ही अभिनेत्री आठवत असेल ही कदाचित तिचे नाव आठवत नसेल पण तिचा अभिनय आणि तिचे रूप अजूनही नक्कीच आठवत असेल. १९७० साली हा चित्रपट लोकांसमोर आला होता. पण इतके वर्ष होऊनही ही अभिनेत्री अजूनही आपल्या स्मरणात आहे. राजकपूर आणि या अभिनेत्रीची जोडी आपल्याला फक्त या चित्रपटात पाहायला मिळाली. त्यानंतर अभिनेत्री आपल्याला या सिने सृष्टीतून गायब झालेली दिसते.
अभिनेत्रीचे नाव आहे सेनिया रेबेंकीना Kseniya Ryambikina पण आपल्याला ती चित्रपटातून मरिना या नावाने माहीत आहे. ती एक रशियन अभिनेत्री आहे. मेरा नाम जोकर या चित्रपटात ती राजकपूर यांच्या प्रेमात पडते पण शेवटी सगळच अर्धवट राहते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण ही अभिनेत्री सध्या काय करते आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
आता चित्रपट तयार होऊन इतकी वर्ष झाली त्या वेळी त्या अभिनेत्रीचे वय २३ ते २५ वर्ष असेल आणि इतक्या वर्षांनी खरतर तिने आपली सत्तरी ओलांडली आहे हे खरे. ती सध्या रशिया मधेच राहत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी राज कापूर यांना एक विदेशी युवतीची गरज होती. रशियामध्ये गेल्यानंतर विविध सर्कशींच्या तंबूत राज कपूर दिवस दिवस घालवायचे. तेव्हा त्यांना ही अभिनेत्री मिळाली पण ती बॅलेत काम करणारी होती. पण या चित्रपटानंतर तिला बॉलिवूड मध्ये एकही काम मिळाले नाही. त्यामुळे तिने पुन्हा आपल्या मायदेशी जाण्याचे ठरवले. आणि पुन्हा बॅले डान्स मध्ये आपले काम सुरू केले.

ह्या अभिनेत्रीचा अभिनय तुम्हाला ह्या सिनेमात आवडला होता का? आम्हाला तुमचे मत नक्की सांगा.