मित्रानो तुम्हालाही वेगळे चित्रपट पाहायला आवडतात का म्हणजे थरारक किंवा भयानक असे चित्रपट तर मग आपल्यासाठी घेऊन येत आहेत हा भयपट या अगोदर ही असे चित्रपट खूप येऊन गेले. काही चित्रपट लोकांना खूप आवडले तर काहींना लोक कधीच विसरूनही गेले कारण त्या चित्रपटाची कथा आणि बॅकग्राऊंड संगीत आणि उत्कृष्ट अभिनेता यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवत असतो. उत्कृष्ट चित्रपटाला प्रेक्षकांनी नेहमीच प्रतिसाद ही दिला आहे. पण काळ हा चित्रपट कसा आहे आणि प्रेक्षकांना आवडेल की नाही हे आता चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

तर मित्रानो डी संदीप हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट साचेबद्ध करणे हे डी संदीप यांच्यासाठी काही साधी सोपी गोष्ट नव्हती. कारण हा चित्रपट लिहताना आयुष्यातील अनुभवांच्या माध्यमातून चित्रपट पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले होते. शिवाय ते जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा हॉलिवूड मधील भयपट पाहायचे आणि त्यांच्यासारखे भयपट आपणही बनवायचे याच हेतूने हा सिनेमा आपल्या समोर घेऊन येत आहेत. तर त्यांनी चित्रपटाचे टीझर आणि पोस्टर प्रकाशित झाले आहेत शिवाय या चित्रपटामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी नावीन्य पूर्ण असे पाहायला मिळणार असेल याची खात्री आपल्याला हा चित्रपट पाहिल्यावरच होईल. म्हणून २४ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तर जायला विसरू नका.
या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रंजीत ठाकूर, नितिन वैद्य प्रवीण खरात आणि अनुज अडवाणी यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.