ब्रेकअप प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला सर्वात दुःखद क्षण असतो. काहींनी अतिशय जवळून हा अनुभव घेतला असेल तर काहींनी मात्र आपल्या मित्र मैत्रीणीना ब्रेकअप दुःखातून काढून त्यांची सांत्वना केली असेल. तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो ना कारण हा विषयच असा नाजूक आहे की आपण प्रत्येक वेळी यात गुरफटून जातो. प्रेम करताना कधी ब्रेकअप सुद्धा आयुष्यात येऊ शकेल याचा विचार आपण करत नाही.
आज मी तुम्हाला अशाच एका ब्रेकअप स्टोरी बद्दल सांगणार आहे जी लवस्टोरी दिसताना तर आधी सोपी दिसते पण त्यात खूप विरह दडलेला आहे.
आज बऱ्याच महिन्यांनी आम्ही भेटणार आहोत. म्हणजे कमीतकमी ९ महिन्याच्या ही वर अवधी गेलाच असेल. तसे पाहायला गेलो तर कारण खूप शुल्लक होत पण आम्ही दोघांनीही समंजसपणा न दाखवता वाद वाढवत नेला आणि मग होत्याच नव्हतं झालं. आमचं ब्रेकअप झालं, पाहायला गेलो तर चूक दोघांची सुद्धा होती. माझे आणि ओविचे दोन वर्षांपासून एकमेकावर मनापासून प्रेम होतं. एवढं प्रेम होत की एकमेकांना लग्नाच्या आणाभाका दिल्या होत्या. लग्न झाल्यावर काय करायचं? कुठ रहायचं? कसे रहायचं? कोणत्या खिडकीला कोणत्या कलरचा पडदा असेल? घरात आगमन करताना घरावर कोणत्या नावाची पाटी असेल. असे अगदी सर्वच ठरलं होतं
ते म्हणतात ना लग्नाआधीच संसार करायची स्वप्ने पाहिली जातात तसेच काहीसे आमच्यासोबत झालं. होणाऱ्या मुलांच्या नावापासून ते म्हातारपणी गावी रहायचं इथपर्यंत आमचं ठरलं होतं. पण म्हणतात ना पाहिलेली स्वप्न ही फक्त स्वप्नच राहतात. कधी या सुखावर निर्जन पडते हे आपल्याला देखील कळतं नाही.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी तिला प्रपोज केलं होतं. आजही आठवतोय तो दिवस, तिने मी प्रपोज करताच जोरात माझ्या कानशिलात लगावली होती. अक्षरशः सर्व कॉलेजमध्ये मी हास्याचा विषय बनलो होतो. त्या दिवशी मला तिचा सर्वात जास्त राग आला होता. कारण आमच्या मध्ये वर्गात असताना अनेकदा नजरेला नजर भिडली होती. नेहमीच माझी नजर तिच्याकडे गेल्यावर तिची दिल खुलास स्माईल माझ्या काळजात भिडायची. म्हणूनच मला वाटत होत की तिचा माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे. पण आज कानशिलात खाल्यानंतर माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता.
येणारा जाणारा प्रत्येकजण माझ्यावर हसत होता. आजपर्यंत कॉलेजमध्ये माझी एवढी इज्जत कधीच गेलो नव्हती. मुख्याध्यापकांनी बोलावून घेऊन अर्धा तास लेक्चर दिलं. त्यात सर्व शिक्षक समोर, कुणी रागात पाहत होते तर कुणी माझ्याकडे पाहून हसत होते. नेहमीच मी अभ्यासात हुशार पण आज हा मुलगा कसा या भानगडीत अडकला असा प्रश्न शिक्षकांना होताच. पण मी तोंडातून एकही शब्द न बोलता केबिन मधून बाहेर आलो.
परत कधी प्रेमाच्या वाट्याला जाणार नाही मी असे ठरवलेच होते. आता फक्त आणि फक्त अभ्यास करेन, खूप मोठा माणूस होईल, खूप पैसे कमवेन आणि तिच्यापेक्षा चांगली मुलगी बायको म्हणून करेल असे मनाशी थांब ठरवलं होतं. पण हे सुद्धा स्वप्नच राहिले कारण दोन दिवसानंतर तिचा कॉल आला. तिचा समोरून कॉल येईल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. “रागावलास? खरंच खूप सॉरी रे, मनापासून सॉरी. मलाही तू आवडतोस पण संपूर्ण कॉलेज समोर तू मला प्रपोज केलेस, मुलं मुली पाहून हसत होते. मग काय करावं काहीच कळले नाही आणि तुझ्यावर माझा हाथ उचलला. पण त्यासाठी आता मी तुझी माफी मागतेय. Love you काल्या”. तिचे ते शब्द माझ्या मनात एवढे रुतले की डोळ्यातून आश्रू बाहेर पडले.
असे वाटत होतं आता जाऊन हिला मिठीत घ्यावे कारण अखेर कुठे ना कुठे माझे स्वप्न पूर्ण होत होते. पण मी सुद्धा थोडा बालिश राग पकडला. “माझे नाहीये तुझ्यावर प्रेम, किती बोलले सर्व सर मला माहित आहे का तुला? एवढं कधीच वाईट वाटलं नाही. त्यात तू सर्वांसमोर माझ्या कानशिलात लावलीस हे तर अजिबात आवडले नाही मला”. सॉरी सोन्या खरंच मनापासून सॉरी. आता आपण भेटलो ना की जिथे मी तुझ्या मारले आहे ना तिथे किस करेन”. बस तिचे हे एक वाक्य आणि माझा सर्व राग कुठल्या कुठे पळाला होता. अखेर मी ही तिला हो म्हटलं.
तेव्हापासून आमच्या प्रेम प्रवासाला सुरुवात झाली. सोबत कॉलेज येणं, अभ्यास करणे आणि वेळ मिळेल तेव्हा सिनेमाला जाणं हा आमचा दिनक्रम बनला होता. आता आम्हाला एक दोघांशिवाय करमत नव्हते. एकाने जरी सुट्टी घेतली तरी तो एक संपूर्ण दिवस लवकर संपत नसे. कॉलेज सुरू असल्यापासून आम्ही सुखी संसाराची स्वप्ने पाहायला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर पुढील दोन वर्ष मी जॉब केला. ह्या दोन वर्षात आम्ही इतका वेळ सोबत घालवला की आम्हाला एकमेकांची सवय होऊन गेली. आम्ही जणू नवरा बायको आहोत असेच वागत होतो. घरी सुद्धा सर्व माहित होत त्यामुळे आम्हाला बोलणार ही कुणी नव्हतं. मलाही चांगलां जॉब होता त्यामुळे आम्ही लवकरच लग्नाची बोलणी सुद्धा करणार होतो. पण म्हणतात ना चांगल्या चाललेल्या गोष्टींना कुणाची तरी नजर लागते. तसेच काहीसे आमच्या नात्यात झाले.
मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावे लागत असे, कधी कधी तर मी आठवडा आठवडा जिल्ह्याबाहेर राहायचो. त्यामुळे तिचे आणि माझे बोलणे कमी होऊ लागले. ह्यात संशयाच्या किड्याने सुद्धा जन्म घेतला होता. मी असा बाहेर राहिल्याने तिला माझ्यावर संशय निर्माण होऊ लागला होता. त्यात भर म्हणून ती जेव्हा पण मला कॉल करायची तेव्हा मी काहीतरी कामासाठी कुणाशी ना कुणाशी फोनवर बोलत असायचो. त्यामुळे तिचा संशय अजून बळावला होता.
पण मला माहित होत की मी तिच्याशिवाय कुणाचाच विचार करू शकत नव्हतं. मी तिला हे नेहमी पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनात खूप जास्त संशय निर्माण झाला होता आणि अखेर तिने एक दिवस माझ्याशी ब्रेकअप करून टाकलं. त्रास तर तिलाही होत होता पण ती दाखवत नव्हती. मी रडलो, चुकी नसताना माफी सुद्धा मागितली पण तिने माझे काहीच ऐकले नाही.
ब्रेकअप नंतर आयुष्य जणू एक थेंबही पाणी नसलेल्या वाळवंटासारखे झाले होते. मोबाईलची थोडी सुद्धा नोटिफिकेशन वाजली तरी असेच वाटायचे की तिचाच मेसेज आला आहे. ह्या काळात अर्जित सिंग ने खूप साथ दिली. खरंच त्या माणसाच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. त्याची गाणी ऐकताना असेच वाटतं की ते साँग फक्त आणि फक्त आपल्यासाठी लिहिले गेले आहे. माझा पूर्णपणे देवदास झाला होता. यात माझ्या मित्रांनी मला ब्रेकअप काळातून बाहेर काढण्यासाठी खूप मदत केली. पण ती निष्फळ ठरली.
मला आधी वाटले की हा ब्रेकअप काही वेळेपूरता असेल. पण मी इथे खोटा ठरलो कारण तिने ठरवले होते की कधीच मला संधी देणार नाही. पण माझी तर काहीच चुकी नव्हती. पण तिला हे समजूनच घ्यायचे नव्हते. मी त्या काळात तिला खूप मेसेज, खूप कॉल केले. पण तिने एकही मेसेज किंवा कॉलचा रिप्लाय केला नाही. मी वेड्यासारखा एका संधी अभावी धडपडत होतो.
तरीसुद्धा मी तिला मेसेज करत राहिलो. अखेर तिने माझ्या मेसेज ना कंटाळून मला ब्लॉक सुद्धा केले. पण मला त्या गोष्टीचा सुद्धा राग आला नाही कारण माझे तिच्यावर खूप प्रेम होतं. मला काही केल्या ती परत माझ्या आयुष्यात हवी होती. काही महिने गेले तरी तिने मला कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही. काळ तिचा फोन आला. भेटायला बोलावले आहे. सर्व पूर्वरत करू असे म्हणतेय. मी खुश तर खूप आहे पण नक्की मी तिला भेटायला जाऊ की नको ह्या संभ्रमात आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांना मी जावे की नाही? मला कमेंट करून नक्की सांगा.
लेखक : पाटीलजी
या कथा पण वाचा
Valentine’s Week कथा मालिका
लेखक : पाटीलजी