Home करमणूक मराठी सिनेसृष्टीतून कुठे हरवल्या ह्या नायिका?

मराठी सिनेसृष्टीतून कुठे हरवल्या ह्या नायिका?

by Patiljee
436 views

मित्रानो मराठी चित्रपट सृष्टीचा नियम आहे की जो इथे थांबला तो थांबला आणि ज्याने या इंडस्ट्रीला राम राम ठोकला तो कायमचा येथून पुढे गेला, अशाच काही मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक मालिका, नाटके आणि चित्रपट केले पण त्यानंतर मात्र या अभिनेत्री आपल्याला पुढे कोणत्याच मालिकेमध्ये पाहायला मिळाल्या नाहीत, कोण आहेत त्या अभिनेत्री पाहूया.

नेहा गद्रे
ही सुद्धा आपल्याला स्टार प्रवाह या चॅनल वर असणारी मन उधाण वाऱ्याचे या मालिकेमध्ये पाहायला मिळाली होती, अजूनही चांद रात आहे ही मालिका आणि मोकळा श्वास या चित्रपटानंतर तिचा कोणताही प्रोजेक्ट आली नाही. यावरून कळते तिने या इंडस्ट्री पासून फारकत घेतली आहे. ती आता आपल्या लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

सारा श्रवण
ही अभिनेत्री पिंजरा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर तीच लग्न झाले आणि तिला एक मुलगा ही आहे तिने स्वताला आता मालिका आणि सिनेमा यांच्यापासून लांब ठेवले आहे.

रेश्मा नाईक
झी मराठीवरील खूप लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेमध्ये ही अभिनेत्री गंगाधर टिपरे यांची नात म्हणजे रेश्मा नाईक ही आपल्याला पाहायला मिळाली होती. तीच नाव होत शलाका ती प्रेक्षकांना त्या वेळी खूप आवडली होती पण यानंतर मात्र ती मालिकांमध्ये दिसली नाही ती आता लग्न करून आपल्या संसारात मग्न आहे.

कादंबरी कदम
अवघाचि संसार आणि तुझविन सख्या या मालिकांमधून प्रेक्षकांना भावलेली कादंबरी ही अभिनेत्री तिने दिग्दर्शक अविनाश अरुण याचेसोबत तिने लग्न केले आहे. तिला एक मुलगा ही आहे. पण सध्या तरी तो मालिका, नाटक आणि चित्रपट या पासून लांबच आहे.

पल्लवी सुभाष
ह्या अभिनेत्रीने ही मालिका केल्या लोकांनीही ती खूप आवडली पण नंतर ती या सगळ्यापासून जरा लांबच आहे तिची सर्वोत्कृष्ट मालिका चार दिवस सासूचे आणि गुंतता हृदय लोकांना आवडल्या होत्या.

नीलम शिर्के
वादळवाट, असंभव आणि राजा शिवछत्रपती या मालिकांमधून अनेक प्रकारचे रोल करणारी ही अभिनेत्री सध्या तरी या सगळ्यातून दिसेनाशी झालेली दिसते.

केतकी थत्ते
ही अभिनेत्री अनेक जुन्या होऊन गेलेल्या मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आभाळमाया या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळाली होती तसेच काटकोन त्रिकोण आणि बंधमुक्त हे तिचे नाटक ही आले होते केतकी उत्तम नृत्य करते त्यामुळे आपल्या नृत्याचे कार्यक्रम ती अनेक ठिकाणी करत असते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल