Home विचार मांजर आपल्या रस्त्यातून आडवी जाने शुभ की अशुभ? काय वाटते तुम्हाला?

मांजर आपल्या रस्त्यातून आडवी जाने शुभ की अशुभ? काय वाटते तुम्हाला?

by Patiljee
1683 views

आज जग कुठे चालले आहे आणि आपण अजूनही त्याच त्याच जुन्या चालीरीती कवटाळून बसलो आहोत. काही लोक तर इतके आहारी गेलेले असतात की बस रे बस, आता हेच बघा ना बाहेर जाताना कोणी कुठे चालास हे बोलणे ही अवघड होऊन बसले आहे शिवाय रात्री कुत्रा रडणे हे सुध्दा अपशकून मानतात, घुबडाच दर्शन होणे वाईट त्याच प्रमाणे मांजर आडवे जाणे हे ही आपण अशुभ मानतो. पण हे मानने खरंच तुमच्या जीवनाच्या दृष्टीने खूपच घातक आहे असे नाही का तुम्हाला वाटत.

मांजर आडवी जाणे शुभ की अशुभ ही पूर्वी पासून चालत आलेली परंपरा आहे. पण त्यात कितपत सत्य आहे हे अजुन कोणीही पडताळून पाहिले नाही. तर काही लोक अनाहूतपणे अंधश्रध्देच्या आहारी जातात, आणि त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. कारण अंधश्रद्धा याचे खापर आपण इतरांवर फोडू शकत नाही. लोक लाख सांगतील हों पण कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या नाही हे आपल्याला कळायला हवे त्यासाठी आपण सक्षम आहोत.

तुमच्या समोरून मांजर आडवी गेल्यावर तुम्ही काय करता तर पाच पावलं मागे जाता किंवा तो रस्ता बदलून सरळ दुसऱ्या रस्त्याने जाता किंवा परत माघारी घरी जाता. त्यामुळे काय होते तर तुमची कामे अडून राहतात, नुकसान तुमचे होते, होणारी कामे पुढे ढकलली जातात, पण तुम्हाला हे का नाही कळत की मांजर हा एक आपल्यासारखाच जीव आहे आणि त्यालाही सर्व दिशांना फिरण्याचा अधिकार आहे. आपण कुठे चालोय याची त्या जीवाला अजिबात जाणीव नसते. तो सरळ आपल्या मार्गे जात असतो, पण तरीही तुमच्या मनातील गैरसमज तुम्हाला रस्ता बदलण्यासाठी भाग पाडतो.

कदाचित एक वेळ अशी ही येते जेव्हा मांजर आडवी जाते आणि तुम्ही हे दुर्लक्ष करून पुढे जाता आणि नेमके तुमचे काम होत नाही यावेळी तुम्ही सगळा दोष त्या मांजारावर टाकता पण हे चुकीचे आहे कदाचित अगोदरपासून ते काम होणे शक्य नसेल म्हणून झाले नाही असा विचार का नाही करत तुम्ही. आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा त्यावरून तरी समजेल आताच्या काळात अंधश्रद्धा फक्त नावाला उरली आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल