Home संग्रह मंगळसूत्राचे हे महत्त्व तुम्ही आजवर वाचले नसेल

मंगळसूत्राचे हे महत्त्व तुम्ही आजवर वाचले नसेल

by Patiljee
2075 views

आपल्या संस्कृतीत मंगळसूत्र घालने हे स्त्रियांसाठी एक पवित्र बंधन मानले जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक स्त्रीला मंगळसूत्राचे महत्त्व माहिती असायला हवे. ज्या दिवशी पुरुष हे मंगळसूत्र आपल्या बायकोच्या गळ्यात घालून तू आता माझी झालीस हा त्या मागचा उद्देश आहे. गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर एका कुमारी कन्येचे सवाशिन मध्ये रुपांतरीत होते. तसेच लग्न झालेल्या स्त्री मध्ये कुंकू आणि जोडवी यापेक्षा जास्त महत्त्व हे मंगळसूत्राला असते. आजच्या काळात काही स्त्रिया या सगळ्या गोष्टी पाळत नाही पण जे आपल्या संस्कृतीत आहे ते आपल्याला पाळायला हवे.

काळया मण्यांनी बनवलेले हे मंगळसूत्र प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीने घालायला हवं. आताच्या काळात पहिल्यासारखे धाग्यात मंगळसूत्र बांधलेले नसते तर सोन्याच्या चैनी मध्ये हे बांधले जाते. पूर्वीच्या काळी स्त्रिया या रेशमाच्या धाग्यात मंगळसूत्र बांधायच्या. कित्तेक वेळा मंगळसूत्र घालने म्हणजे लग्न झाल्याचे लायसन अशी थट्टा करणारे लोक आपल्या समजात भरपूर आहेत पण त्याचे महत्व जाणून घ्या. मंगळसूत्र हे सूवाशिणीचे संरक्षक कवच आहे. जेणेकरून त्या स्त्रीकडे लोक बघताना थोडी तरी मनात भीती येतेच.

मंगळसूत्र हे नेहमी स्त्रीच्या हृदयापर्यंत येईन इतके लांब असावे. शिवाय त्याला दोन वाट्या असाव्या. मंगळसूत्र काळे मणी का असतात बर याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर आपल्या सुखी संसारात कोणत्याही तीसऱ्या व्यक्तीची वाईट नजर लागू नये यासाठी हे काळे मनी असतात, आता काळा रंग हा नजर लागू नये यासाठी वापरतात हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. हल्लीच्या मुलींना वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र घालायला आवडत नाही. मुळात ते त्या कपड्यांवर अजिबात शोभत नाही अशी त्यांची भावना असते. पण हल्ली वेगवेगळ्या स्टाईल मध्ये मंगळसूत्र निघाले आहेत जे साडी पासून ते जीन्स पर्यंत कधीही वापरू शकता. आजकाल विधवा स्त्रिया ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मंगळसूत्र घालताना दिसतात त्यात काहीच गैर नाही.

आपण काळानुसार बदलायला हवं हे खरं आहे पण त्यासोबत आपण आपली संस्कृती ही जपायला हवी. काही स्त्रिया मंगळसूत्र म्हणून हातात आहे घालतात पण हे पूर्णपणे चुकीचे आहे मंगळसूत्र हे हातात नाही तर गळ्यात घातल्याने त्याचे पावित्र्य वाढते. लग्न झालेल्या स्त्री ने गळ्यात मंगळसूत्र घातल्याने जी शोभा येते ती नुसती चैन घालून येत नाही. मान्य आहे तुम्हाला रोज मंगळसूत्र घालने योग्य वाटत नसेल पण आपले सणवार जेव्हा येतात तेव्हा मंगळसूत्र घालण्यास कोणती हरकत असायला हवी असे आम्हाला तरी नाही वाटत.

दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल