आपल्याला माहितीच आहे की अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांचे आयुष्य खूप झगमगळेले असते. आपण जसे त्यांचे सिनेमे मोठ्या आवडीने पाहतो तसेच आपल्याला त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास आतुरता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याच्याकडे ३६९ कार आहेत. आता तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल पण हे खरं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अभिनेता दररोज वेगवेगळी गाडी चालवतो आणि तो स्वतः गाडी ड्राईव्ह करतो.
सिनेमा जगत आणि कलाकार ह्यांचे गाड्यांचे क्रेझ तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. पण आपण बॉलीवुड म्हटले की जॉन अब्राहमचे स्पोर्ट्स बाईक कलेक्शन आणि स्पोर्ट्स मध्ये महेंद्र सिंग धोनी चे गाडी प्रेम जगजाहीर आहे. पण मल्याळम आणि तमिळ सिनेमाचे सुप्रसिद्ध अभिनेते ममुटी ह्यांच्याकडे ३६९ कार आहेत हे तुम्हाला माहीत नसेल. आयुष्याच्या सुरवातीला त्यांनी मारुती ८०० ही पहिली गाडी विकत घेतली होती आणि आता येणारी प्रत्येक गाडी त्यांच्याकडे हवीच अशी त्यांची इच्छा असते. स्वतच्या गाड्यांसाठी त्यांनी वेगळं गॅरेज तयार केलं आहे.

जगुआर XJ-L ही सर्वात लेटेस्ट अशी गाडी त्यांच्या ताफ्यात आहे आणि महत्त्वाचे म्हणजे डिझेल आणि पेट्रोल हे दोन्ही मॉडेल त्यांच्याकडे आहेत. ह्या गाडीचा नंबर KL 7BT 369 आहे. त्यांच्या बऱ्याच गाड्यांवर ३६९ हा गाडी नंबर पाहायला मिळतो. साऊथ सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पहिली ऑडी गाडी विकत घेण्याचा मान ह्यांच्याच नावावर आहे.