Home प्रवास मालदीव बेटावर जाण्यासाठी तुम्ही उस्तुक आहात का तर मग त्याअगोदर जाणून घ्या त्याबद्दल ची माहिती

मालदीव बेटावर जाण्यासाठी तुम्ही उस्तुक आहात का तर मग त्याअगोदर जाणून घ्या त्याबद्दल ची माहिती

by Patiljee
1441 views

सुट्टीचा बेत आखला आहे का तुम्ही आणि सुचत नसेल कुठे जायचे तर अशा ठिकाणी जा जिथे गेल्यावर तुमचे मन तेथील सुंदरता बघूनच मंत्रमुग्ध होईल. आहे असे एक ठिकाण मालदीव बेट या ठिकाणी 1109 बेट आहेत. हा देश एक दक्षिण आशियायी बेट आहे. जो हिंद महासागर यामध्ये वसलेला आहे. सांगतात की या बेटावर पहिल्यांदा भारतातील लोक आले. असेही म्हणतात की भारतातील कलिंग राजा याच्या मुलाने इथे सर्वात पाहिले वास्तविक साम्राज्य स्थापन केलं होतं.

मालदीव हा सर्वात सुरक्षित असा पर्यटन स्थळ आहे. तसेच ज्यांचे नवीन लग्न झाले आहे त्यांनी हनीमुनला जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ही आहे. या ठिकाणी आपल्या जोडीदाराला घेऊन येथील समुद्र किनाऱ्यावर बसणे शिवाय अत्यंत शांतता असणाऱ्या या भागात तुम्हाला जणू स्वर्गात आल्यासारखे वाटेल. येथील समुद्राचे पाणी एकदम काचेसारखे स्वच्छ आणि पारदर्शी आहे. येथे मिळणारे कॉक्टेल, समुद्री माशांचे जेवण आणि समुद्री विमानाची सफर तुमच्या आनंदात भर घालणारे असतील. तसे ही इथे भरपूर प्रकारचे बेट तुम्हाला पाहायला मिळतील. पण यातील बेस्ट बेट कोणते आहे ते पाहूया.

माले बेट
हा बेट हनीमुन कपल साठी प्रसिद्ध असा बेट आहे. तसेच माले ही या देशाची राजधानी आहे. येथेल किनाऱ्याला आर्टिफिशियल किनारा असे म्हणतात. येथे तुम्ही आपल्या जोडीदार सोबत पोहण्याचा आनंद घेऊ शकता. शिवाय समुद्री माशाच्या आनंद आपल्या जेवणात घेऊ शकता.

हल हुमाले बेट
हा सुद्धा मानवनिर्मित बेट आहे माले बेटावर वाढणारी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी या बेटावर वस्ती निर्माण करण्यात आली येथील मंत्रमुग्ध करणारे शांत समुद्र किनारे यामुळे तुमच्या मनाला वेगळीच शांतता मिळते येथील कमी लोकांची वर्दळ तुमच्या मनाला भावून जाईल

वाधू बेट
या बेटावरील सर्वात आकर्षण म्हणजे येथील पाणी हे रात्रीच्या वेळी निळसर रंगाने चमकते आणि हे पाणी पाहण्यासाठी विदेशी खूप जास्त प्रमाणात येथे येत असतात.

बियाधू बेट
येथील स्वच्छ आणि काचेसारखा दिसणारा समुद्र किनारा कोणाला नाही आवडणार? तुम्हालाही इथे पोहण्याचा मोह आवरणार नाही. तसेच या बेटावर इतर बेटांपेक्षा अधिक झाडी आहे. म्हणजे नारळ,आंबा आणखी अनेक झाडे तुम्हाला येथे दिसून येतील. तसेच या ठिकाणी खेलले जाणारे वॉटर स्पोर्टस् साठी दूरदूर हून लोक येतात.

फी हलोही बेट
येथे सर्वात जास्त आकर्षित करणारे म्हणजे पाण्यात बांधलेले एका पोठोपाठ असे सलग बंगले आहेत. आपल्या जोडीदारासोबत येथे जायला कोणाला नाही आवडणार. येथील नारळाची आणि खजुराची झाडे तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी असणारे स्पा येथील प्रमुख आकर्षण आहे.

मफुशी बेट
येथील स्वच्छ समुद्र किनारे आणि रेस्टॉरंट येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष महत्त्वाचे ठरते येथे कपल साठी खूप सारे स्पोर्ट आणि बोट सफर आहेत यांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

नाला गुरेधू बेट
चारी बाजूंनी रंगीत फुलांनी आणि नैसर्गिक सुंदरता यांनी घेतलेला हा बेट बघायला तितकाच सुंदर आणि स्वर्ग समान भासतो. त्याचप्रमाणे येथे असणारे स्पा आणि हॉटेल्स कपल साठी अगदी उत्तम आहेत. आपल्या नैसर्गिक सुंदरतेचे प्रतीक हा बेट हनीमुन कपल साठी बेस्ट असा बेट मानला जातो.

आता आपण बघुया या ठिकाणी कसे जायचे
मालदीव ची राजधानी येथे पोचण्यासाठी केरळ वरून सरळ तिरुअनंतपुरम आणि तिथून पुन्हा हवाई मार्गे माले पर्यंत तर दिल्ली हून कोलंबो पासून माले पर्यंत हवाई मार्गे जातात. तर मुंबई हून ही डायरेक्ट मालेला आपण आंतरराष्ट्रीय हवाई मार्गे जाऊ शकता.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल