मित्रानो जेव्हा पावसाळा सुरू झाला की मका भाजून खायची खूप इच्छा व्हायची. पण सध्याच्या काळात प्रत्येक सीजनला मका उपलब्ध असतो. भाजलेला मका आणि त्यावर मीठ, मसाला आणि लिंबू चोळलेला मका खायला तितकाच झकास लागतो. शिवाय उकडलेला मका ही खायला मस्त गोड लागतो. या मक्याच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ घरात बनवले जातात. कधी कॉर्न सूप तर कधी पॅटीस बनवले जातात. पण याची खरी गोडी नुसता मका खाण्यात आहे. बघुया तर आज हा मका खाल्याने कोणकोणते घटक आपल्या शरीराला मिळतात.

मका खाण्याचे फायदे
हे मक्याची कणसे आपण ज्या पाण्यात उकडतो ते पाणी घ्या हे पाणी जर तुम्हाला मूत्रपिंडाचे आजार असतील तर हे गुणकारी आहे. तसेच या पाण्यात थोडी खडीसाखर मिसळून प्या. यामुळे लघवी करताना आग होत असेल तर कमी होईल. शिवाय याच पाण्यात थोड मीठ आणि हळद टाकून प्यायल्यास वात आणि पित्ताचा त्रास कमी होतो.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते त्यामुळे ज्यांना हाई बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी मका खाल्लेले उत्तमच आहे.
गुणकारी आणि रोजच्या आहारातील कोकम बघा किती उपयोगी आहे.
अशक्तपणा असेल तर मका नक्की खावा. मक्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. मका रक्त वाढवण्याचे काम करते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे अशा लोकांनी खाल्लेले उत्तमच.
मक्याचे कणीस जाळा त्याची राख करा. या राखेत थोडा मीठ मिसळा आणि हे चाटा. यामुळे तुम्हाला झालेला खोकला किंवा कफ सर्दी कमी होते.

मक्यात असलेल्या फॉलिक एसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो आणि म्हणून मका खाणे अती गरजेचे आहे.
ज्यांना मका खायला आवडतं असेल त्यांनी मक्याची पोळी करून खा. कारण मका आपल्या शरीरातील किती महत्वाचा आहे हे समजलेच असेल. हे पण वाचा चहा प्या तो ही फक्त कोरा आणि रहा हेल्दी बघा कोणकोणते फायदे मिळतात