राणीचा आलेला असा मेसेज पाहून मी भांबावलो. कसे शक्य आहे हे? मी तर आजवर हे तिला कधीच सांगितले नव्हते की मीच मिस्टर अनोळखी हा तुझ्याच वर्गातील महेंद्र आहे. एवढेच काय तर आमच्या वर्गातील कोणत्याच मुला मुलींना मी हे समजूनच दिले नव्हते. मग राणीला याबद्दल कसे कळले. रिप्लाय करायला सुद्धा माझे हात थरथरत होते. तरीही मी मेसेज केला.
मी: काय…? तुला कसे माहीत? सॉरी सॉरी माझे चुकलं खूप सॉरी. मला तुझ्यापासून हे लपवायचे नव्हते पण वर्गातील सर्व मुलं तुझ्याशी बोलत होती पण माझीच हिम्मत होत नव्हती की समोरून येऊन तुझ्याशी बोलावं. म्हणून मी हा मेसेजचा मार्ग निवडला. खूप सॉरी राणी.. माझी खूप मोठी चूक झाली.
ती: अरे हो हो हो किती वेळा सॉरी म्हणणार आहेस आता? एवढे काहीही केले नाहीस प्लीज असं गिल्टी फिल करून घेऊ नकोस.
मी: हो पण तरीही…
ती: तरीही काही नाही शांत हो जरा आणि हो जो घाम आला आहे डोक्याला तो पुस जरा.
मी: तुला कसं कळलं माझ्या डोक्याला घाम आला आहे ते?
ती: एवढ्या दिवसात हे मी अनुभवले आहे की तू जेव्हाही स्ट्रेस मध्ये असतोस टेंशन घेतोस तेव्हा तुझ्या डोक्याला घाम येतो. म्हणून म्हणाली.
मी: हमम… ऐक ना. सांग ना तुला कसे माहीत मीच मिस्टर अनोळखी आहे ते.
ती: ज्या दिवशी तू मेसेज केलास ना त्याच दिवसापासून मला माहीत आहे.
मी: 🥺 कसे शक्य आहे. आणि एवढं सर्व माहीत असून देखील तू माझ्याशी अनोळखी व्यक्ती सारखी बोलत होतीस?
ती: अशीच रे जरा तुझी गंमत करत होते.
मी: मला सांग आधी तुला कसे कळले?
ती: अरे ठोंब्या.. तू रोहन कडून नंबर मागितला होतास ना? आणि तू हे विसरला की आम्ही रोज एकत्र बस ने येतो आणि सोबत जातो. मग जेव्हा तू नंबर मागितलास तेव्हाच त्याने मला सांगितले होते की महेंद्र ने तुझा नंबर मागितला आहे आणि एवढेच नाही तर तुझा नंबर त्याने मला आधीच देऊन ठेवला होता की जेणेकरून तू मेसेज करशील तेव्हा मला कळावं की महेंद्रचा हा नंबर आहे. कळलं का मंद मुला?
मी: सॉरी..
ती: सॉरी काय रे त्यात. खरं सांगू मला वाटलं होतं तू मेसेज करशील मला पण काहीतरी वेगळं करशील म्हणजे नॉर्मल हाय, हॅलो, गुड मॉर्निंग वैगेरे पण तुम्ही तर षटकार मारलात डायरेक्ट.. ते सुद्धा मिस्टर अनोळखी बनून. वाह.. हसू येत होत खूप पण मज्जा पण आली.
मी: मी आता काय बोलू काहीच सुचत नाहीये मला.
ती: मला एक सांग वर्गात एवढा शांत असणारा तू, मोबाईल आड गेला की एवढी हिम्मत येते कुठून? कसा बोलतो चुरूचुरू. कुणाला वाटणार पण नाही की चाटमध्ये बोलणारा आणि समोर असणारा माणूस एकच आहे म्हणून
ग्रेट आहेस तू. दोन्ही कला फार छान जमतात तुम्हाला.
मी: मी असं कधी करत नाही पण तुझ्याशी समोर बोलायची हिम्मत नाही झाली. मग विचार केला ऑनलाईन बोलूया बघुया काही जमतेय का?
ती: मग जमलं का?
मी: ते आता तूच सांगू शकतेस. तुला आधी पासून सर्व माहीत होत आणि तू माझी मज्जा घेत होतीस हे ऐकूनच मी क्लीन बोल्ड झालोय.
ती: हो रे पण मज्जा आली. माहीत नाही मला मी समोर आल्यावर तुझ्याशी काय बोलेल पण हा चाटमध्ये असलेला मिस्टर अनोळखी आवडतो मला.
मी: आवडतो म्हणजे खरंच असा प्रेमासाठी आवडतो मी असेच आपले जनरल लोकं आवडतात तसा आवडतो?
ती: प्रश्न खूप मोठा आहे पण उत्तर अगदी लहान आहे. पण आज नाही. उद्या जेव्हा तू समोर भेटशील ना तेव्हा सांगेन नक्की कसा आवडतोस?
मी: हो चालेल मी वाट पाहीन. आणि ही लग्नाची काय भानगड मुलगा पाहून गेला तुला?
ती: अरे बावळट मस्करी करत होती मी तुझी? एवढेही कळलं नाही का तुला? मला पहायचं होतं माझ्या लग्नाचा विषय निघाला की तुझ्या चेहऱ्यावर कसे हावभाव येतात
मी: तू अजून किती बॉम्ब फोडणार आहेस? म्हणजे ही पण मस्ती होती आणि मी इथे वेड्या सारखा रडत बसलो. मला असे वाटत होतं मी तुझ्यासोबत खेळतोय पण तूच मला चेक मेट करून टाकलेस.
ती: हो मग मी आहेच हुशार.
मी: नुसती हुशार नाही तर भलतीच हुशार आहेस तू. ऐक ना उद्या थोडी लवकर येशील आपण भेटू, बोलू पण यावेळी चाट मध्ये नाही समोरासमोर.
ती: मी आताच हो म्हणाले भेटेन तर लागेल ना तुला रात्रभर झोप?
मी: तू हो बोल अथवा नाही बोल. तसेही आज रात्रभर मला काही झोप लागत नाहीये.
ती: 😂😅
मी: येशील का उद्या लवकर?
ती: हो येते मी. तू माझ्या स्टँडवर येऊन थांब.
मी: 😍 चालेल.
ती: घड्याळात पाहिलेस का? आपण चाट करण्याच्या नादात विसरून गेलोय. दोन वाजलेत बघ.
मी: असुदे ग त्यात काय होतं?
ती: नको नको मला झोपू दे परत उद्या लवकर यायचं आहे ना मिस्टर अनोळखीना भेटायला! मग रात्रभर जागलो तर सकाळी जाग कशी येणार?
मी: ओके बाबा ठीक आहे. झोप शांत. गुड नाईट राणी.
ती: गुड नाईट ठोंब्या.
राणी तर झोपी गेली पण माझ्या नजरेसमोर आमच्या पहिल्या दिवसापासून केलेली चाट आठवत होती. कसा मी बोलत होतो? क्लासमध्ये सुद्धा असताना पण बोलायचो? म्हणजे ती माझ्याकडे पाहून माझ्याशी बोलायची, आणि तिच्या प्रमाणे मी मंद मुलासारखा स्वतःला ग्रेट समजून मिस्टर अनोळखी बनून चाट करत राहिलो. माझेच माझ्यावर मला हसू येत होतं.
सकाळी लवकरच तयारी केली आणि बस स्टॉप गाठलं. पण बस नेहमीच्या वेळेवरच होती आणि मला लवकर पोहोचायचे होते. मी पुढचा मागचा विचार न करता भाजी मार्केटला जाणाऱ्या टेम्पो मध्ये चढलो. रोज आमच्या गावातून पनवेल शहरात हा टेम्पो जातो हे मला माहीत होतं. टेम्पोमध्ये बसताच मी तिला मेसेज केला, “गुड मॉर्निंग राणी, निघालो मी.”
पनवेल पोहोचताच मी टेम्पो चालकाचे आभार मानत बस स्टँड गाठलं. माझ्या आधीच राणी येऊन तिथल्या एका बाकावर बसली होती. किती गोड दिसत होती ती, असे वाटतं होतं लांबूनच तिला फक्त पाहतच राहू. एवढ्यात माझी तंद्री उडाली. फोन रिंग करत होता, पाहिला तर राणीचाच फोन होता. मी फोन उचलला, “काय रे कधीपासून आलीय मी, आहेस कुठं तू अजून?” मी म्हणालो, हा बघ तुझ्या मागेच तर आहे.
मागे पाहताच ती माझ्याकडे आली आणि पुन्हा भडकली, इथेच आहे तरी फोन उचलतोस ठोंब्या. मी सुद्धा हसलो. “सांग काय बोलायचं होतं? लवकर का बोलावलेस आज?” ती त्याच स्वरात म्हणाली. “अग हो हो जरा धीर धर वेळ आहे अजून, एक तास पडला आहे. चल बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊया आणि मग गप्पा मारू.”
पनवेल बस स्टॉपच्या बाजूलाच विसावा हॉटेल आहे. आम्ही तिथे जाऊन बसलो. पण माझी नजर मात्र राणीवर अडकून राहिली होती. तिने लावलेली लाल रंगाची डार्क लिपस्टिक, मोकळे ठेवलेले केस, माथ्यावर चंद्रकोर. अगदी आज जणू ती स्वर्गातील अप्सरा भासत होती. मी फक्त तिच्याकडे पाहतोय हे पाहून तिनेच विषय काढला.
ती: दिवसभर असाच पाहणार आहेस का?
मी: तुझी परवानगी असेल तर हो. नक्कीच.
ती: बोल ना काय बोलायचं होतं, दहा वाजले तर कॉलेजला जायला लागेल, मग वेळ नाही मिळणार बोलायला.
मी: असे असेल तर नको जाऊया कॉलेजला.
ती: चालेल तुला?
मी: आवडेल मला.
कथेचा सातवा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा
मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.
ह्या पण Horror कथा वाचा.
- ऑफिस मधील नाईट शिफ्ट
- पोस्टमॉर्टम
- बस मधील ती सिट
- भयाण शांतता
- राक्षसी आत्मा
- लॉक डाऊन मधली ती भयाण रात्र
- अमावस्या
लेखक: पाटीलजी