संपूर्ण रात्र लाईट काही आली नाही. स्विच ऑफ असलेला मोबाईल घेऊन कॉलेज गाठलं. रात्री पूर्ण झोप झाली नाही कारण लाईट नव्हती आणि मोबाईल सुद्धा ऑफ होता. राणीला काय वाटतं असेल याच विचारात संपूर्ण रात्र निघून गेली. कॉलेजला आल्यावर आधी मोबाईल चार्जला लावला. आज सर्वात आधी मी वर्गात पोहोचलो होतो.
कथेचे मागचे तीन भाग इथे क्लिक करून वाचा
मोबाईल स्विच ऑन करणार एवढ्यात मुलं मुली वर्गात यायला सुरुवात झाली. राणी सुद्धा येताना दिसली. कालपेक्षा आज तिचा मुड जास्त ऑफ दिसत होता. मला कळून चुकलं होतं की तिच्या मुड ऑफचे कारण मीच आहे. घाई गडबडीत मी फोन ऑन केला पण एवढ्यात मॅडम वर्गात शिरल्या आणि मग पुढील तीन तास मी मोबाईल हातात सुद्धा घेऊ शकलो नाही.
लंच ब्रेक होताच सर्व मुलं आपापला टिफीन बॉक्स उघडतं होती आणि मी मात्र माझा मोबाईल हातात घेतला. पाहिले तर राणीचे सात मेसेज होते.
ती: मेसेज वाचून सुद्धा रिप्लाय नाही. चांगलं आहे.
ती: ठोंब्या कुठे गायब झालास?
ती: आता तर तुला मेसेज सुद्धा पोहोचत नाहीये.
ती: ठीक आहे ना सर्व?
ती: काय रे तू असा?
ती: गूड नाईट. काळजी घे.
ती: गुड मॉर्निंग.. अजून तुला मेसेज पोहोचले नाही. सर्व ठीक आहे ना. कॉल करावेसे वाटतंय पण कसे करू कळतं नाहीये.
तिचे हे मेसेज पाहून मी थोडा घाबरलो. मला कळून चुकलं होतं की राणी साहेब आमच्यावर रागवल्या आहेत. पण आनंद या गोष्टीचे वाटतं होतं की तिला माझी काळजी आहे. माझा मेसेज नाही आला तर ती किती घाबरली आहे. खरंच हे सर्व पाहून मनात कारंजे उडत होते. मी मेसेज केला, ” सॉरी सॉरी राणी खरंच मनापासून सॉरी. काल रात्री तुझे मेसेज पाहिले आणि रिप्लाय सुद्धा टाईप केला पण मोबाईल त्याच क्षणी स्विच ऑफ झाला. चार्जिंग करणार तर रात्रभर घरी लाईट नव्हती.
माझा मेसेज तिने वाचला पण रिप्लाय काहीच दिला नाही. पण जरी रिप्लाय नाही आला तरी ती ओके वाटतं होती. काही काळजी करण्याचे कारण नाही हे पाहून आणि तिची निघून गेलेली स्माईल परत एकदा चेहऱ्यावर दिसून येत होती. ते पाहूनच मी खुश झालो. आजचा दिवस संपताच मी आज सुद्धा जाऊन पनवेल बस स्टॉपवर जाऊन बसलो. अजूनही तिचा रिप्लाय आला नव्हता. मी पुन्हा मेसेज टाईप करणार एवढ्यात तिचाच मेसेज आला.
ती: तू ठीक आहेस हे खूप आहे. मला काळजी वाटली म्हणून एवढे मेसेज केले तुला.
मी: माझी काळजी का वाटली पण तुला?
ती: जातोस का आता ठोंब्या?
मी: सांग ना का वाटली?
ती: मित्राची काळजी वाटणारच ना? काल रात्रीपासून तुझा मेसेज नव्हता.
मी: हा ते तर झालं.
ती: मला माहित आहे तू मला आता कुठेतरी बसून पाहत असशील. मग सांग पाहू मी आज काय घातलं आहे?
मी: तू ना.. आज छान पिंक पंजाबी ड्रेस आणि त्यावर उडणारी लाल कलरची ओढणी घातली आहेस. खूप गोंडस दिसतेस.
ती: ठोंब्या.
मी: मी पाहिले हा आता, कुणीतरी लाजत होतं. हे पण जमतं वाटतं तुम्हाला.
ती: काहीही तुझेतर, मी कुठे लाजतेय.
मी: दिसतेय की ते आम्हाला.
ती: कधी येणार तू माझ्या समोर?
मी: येणार येणार नक्कीच येणार. जा आता तुझी बस लागली आहे बघ नाहीतर निघून जायची ती.
ती: मिस्टर अनोळखी, बरं झालं सांगितले, तुझ्या नादात माझं लक्षच नव्हतं बस कडे. भेटली आता बस मला.
मी: स्टँडींग ने आहेस की भेटली बसायला जागा?
ती : रोहन ने जिंकून ठेवली होती. मग भेटलं बसायला.
मी: ओके. घरी गेल्यावर मेसेज कर.
ती. हा चालेल.
तिला बाय केल्यानंतर राहून राहून माझ्या मनात एक प्रश्न घोंगावत होता की मी असा अनोळखी राहून किती दिवस तिच्याशी बोलणार आहे. माझ्या आधीच जर तिला कुणी प्रपोज केलं आणि ती हो म्हणाली तर माझे काय होईल? नाही नाही मला माझ्या स्वप्नातल्या मलिकेला असे सहजा सहजी गमवायचे नाहीये.
घरी येत असताना डोक्यात तेच चालू होतं. मी सांगू का तिला सर्व.. की मी कुणी मिस्टर अनोळखी नाहीये, तू ओळखतेस मला. मी महेंद्र… महेंद्र पाटील. तुझ्याच तर वर्गात आहे. पण हे सर्व सांगून ती पुन्हा माझ्याशी आधी सारखे बोलेल का? की ती कायमचे बोलणे बंद करून टाकेल?
मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा
मी घरी पोहोचताच तिला मेसेज केला, पोहोचलो मी. पण त्यांनतर तिचा रिप्लाय काही आला नाही. मी आज कट्ट्यावर पण गेलो नाही. मित्राचे खूप फोन येऊन गेले पण मी उचलले नाही. लवकर जेऊन मोबाईल हातात घेऊन बसलो. पण राणी साहेब ऑफलाईन होत्या. घड्याळात अकरा वाजता होते. एवढ्यात तिचा मेसेज आला.
ती: जेवलास का?
मी: हो माझे झालं. तू जेवलीस का?
ती: हो मी सुद्धा जेवले.
मी: आज एवढ्या उशिरा मेसेज. माझ्या कालच्या वागण्याचा बदला घेतेस की काय. 😁
ती: नाही रे असे काही नाही.
मी: मग एवढ्या लेट मेसेज?
ती: सहजच.
मी: काही झालंय का?
ती: नाही.
मी: वाटतं तर नाही तसं?
ती: हम…
मी: सांगणार आहेस का नीट काय झालंय?
ती: अरे काही झालं नाही. उद्या मला बघायला पाहुणे येणार आहेत. त्याचीच तयारी चालू आहे.
तिचा हा मेसेज वाचून माझ्या हातातून मोबाईल असा काही पडला जणू आयुष्य तिथेच थांबलं. हिला बघायला मुलगा येतोय आणि हिला त्याचे काहीच वाटतं नाहीये. मग माझे काय? माझा नाही का हिने विचार केला? पण माझा विचार का करेल ती? मी कोण आहे हे देखील तिला अजून माहीत नाही?
तिच्या या मेसेज ने मला जसं काही वाटलेच नाही, काहीच फरक नाही पडला असे करत मी तिला रिप्लाय केला.
मी: अरे वा चांगलं आहे. मग उद्या तू कॉलेजला जाणार नाहीस का?
ती: नाही रे उद्या सर्व गडबड असेल. नाही जाणार उद्या.
मी: कुठला आहे मुलगा? काय करतो?
ती: कर्जतचा आहे. इंजिनीयर आहे.
मी: चांगलं आहे की. असो चल आता झोप येते उद्या बोलूया.
ती: हो चालेल. तसेही मला उद्या वेळ नाही मिळणार बोलायला.
तिचा हा मेसेज पाहून मला रिप्लाय द्यायचं सुद्धा मन नाही झालं. आतून खूप दुखी झालो होतो. मी खूप उशीर केला. माझ्या स्वप्नातली मलिका माझ्या आयुष्यात येण्या अगोदरच माझ्यापासून लांब जाताना दिसत होती. अंगावर गोधडी घेत मी लहान मुलांसारखा रडायला लागलो. किती तास रडलो माहीत सुद्धा नाही. रात्रभर रडून रडून डोळे सुजले होते. सकाळी आई म्हणाली, काय रे बाबू काय झाला? असं डोळे का सुजलन? बरा नाय वाटतं का? जावं नको आज शाळला.
नाही ग आई, बरं वाटतंय मला. ते रात्री मूवी पाहत होतो ना म्हणून जागरण झालं. मी म्हणालो आणि बॅग खांद्यावर मारत पनवेलची वाट धरली. तसेही मला आज कॉलेजला जायचा अजिबात मुड नव्हता. पण घरी राहिलो असतो तर रडत बसलो असतो म्हणून कॉलेजचा रस्ता धरला. आज बसमध्ये सुद्धा वातावरण शांत झालं होतं. नेहमी सर्वांना हाय हॅलो करणारा मी गप्प जाऊन सीटवर बसलो. सर्वांना कळतं होतं माझे काही बिनसलं आहे पण कुणी येऊन विचारण्याची हिम्मत केली नाही.
कॉलेजला पोहोचलो आणि कुणाशी न काही बोलता जाऊन बाकावर बसलो. किशोर मुलींना कर्सू लिपी शिकवून इम्प्रेशन मारत होता. पण आज माझे मन कशातच लागत नव्हते. आज सर्व जग एका जागी थांबले होते असा भास होत होता आणि एवढ्यात मी पाहिले की राणी दरवाजातून आतमध्ये येत होती.
कथेचा पाचवा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा
क्रमशः
लेखक: पाटीलजी