राणीच्या छातीवर हात फिरवताना मला जाणीव झाली की मी हे चुकीचे करतोय. कारण जरी ती आता माझी प्रेयसी असली आणि मी तिला बायको मानत असलो तरी सुद्धा आमचे अजून लग्न झालं नाहीये. लग्नाच्या आधीच तिच्या एवढ्या जवळ जाणे मला पटले नाही म्हणून मी लांब झालो. कदाचित राणी यासाठी तयार नव्हती. तिला माझ्यात हरवून जायचं होतं. पहिल्या लग्नात सेक्स म्हणून तिच्या आयुष्यात फक्त बलात्कार आला होता.
मायेने, प्रेमाने जवळ घेऊन नवऱ्याने नात्याची घडी हळूहळू उलगडलीच नव्हती. त्यामुळे तिला सेक्स या शब्दापासूनच तिरस्कार होता. पण माझ्या रूपाने पुन्हा एकदा तो स्पर्श, मायेची ऊब ती अनुभवत होती. पण मला ते सध्या नको होतं. एकदा का लग्न झाल की संपूर्ण आयुष्य पडलं आहे, मग त्या गोष्टी आताच करून मला तो नात्यातला गोडवा घालवायचा नव्हता.
तो दिवस कधी संपूच नये असे वाटत तर होतं पण सूर्य बाबा त्यांच्या घरी जाणार तर होतेच. मी आज राणीला सोडायला तिच्या पेण शहरापर्यंत गेलो आणि मग तिथून माझ्या घरी परतलो. घरी येताना उशीर झालाच होता पण मी पाहिले तर अजय विजय प्रफुल संदीप माझी वाटच पाहत होते.
“काय रे साल्या? शहरात शिकायला गेल्यापासून आम्हाला विसरलास ना?” संदीप म्हणाला.
“नाही रे विसरला नाही तर आपले नंबर पण डिलीट केले असतील, ऑनलाईन तर चोवीस तास असतो पण कधीच मेसेज करत नाही.” विजय म्हणाला.
“नाही रे असे काही, जरा अभ्यासाचा लोड आहे त्यात एवढा प्रवास करावा लागतो त्याला मग त्याची दमछाक तर होणारच ना?” अजय ने असे म्हणत माझी बाजू घेतली.
“थांबा थांबा धीर धरा थोडा, मला तर बोलुद्या.” मी म्हणालो.
“तुम्हाला विसरलो असे काही नाही रे फक्त अजय म्हणतोय तसा प्रवास आणि खूप जास्त अभ्यास त्यामुळे वेळ नाही मिळत. पण असो चला आज आपण पार्टी करूया, आजकी पार्टी मेरी तरफ से.” मी असे म्हणताच सर्व खुश झाले.
वशेणी गावाच्या ब्रिज खाली बसण्याची छान जागा आहे, तो शांत समुद्र पाहताना तिथेच कधीच बसून कंटाळा येत नाही. आमची बसण्याची ती नेहमीची जागा पण आज गोष्ट थोडी वेगळी होती. तिथे पोहोचताच विजयने चार बियरच्या बॉटल बॅगेतून बाहेर काढल्या. ते पाहताच मी म्हणालो, “येड लागलेय का रे तुला? कशाला आणल्या आहेस या बॉटल्स, आपल्यात तर कोण पित सुद्धा नाही.” माझे हे वाक्य ऐकताच सर्व विजय कडे पाहून हसू लागले.
मला कळून चुकलं होतं की विजय प्यायला लागला आहे. त्याच्यावर सर्व हसत असताना तो म्हणाला, “आता गप्प बसा आणि एक एक बॉटल उचला सर्वांनी, आता आपण एवढे पण लहान नाही राहिलो की किमान एक तरी बिअर पिऊ शकत नाही. We are 21 right now so no issue just enjoy this movements”
त्याचे हे ऐकताच प्रफुल आणि अजयने त्याच्या बोलण्याला सहमती दिली. पण मी आणि संदीप यासाठी तयार नव्हतो. दारू कधीही वाईट हेच तर ऐकत आलोय लहानपणापासून मग तिचे सेवन करणे चुकीचेच आहे. पण मित्रच ते, ऐकणार थोडी होते. एक ग्लास माझ्याकडे सरकावत म्हणाले फक्त एकच ग्लास घे बाकी नको. त्यांचा एवढा फोर्स आणि आधीच मी त्यांना वेळ देत नाही म्हणून चिडलेले असताना पुन्हा एकदा त्यांना नाराज नव्हते करायचे म्हणून मी एक ग्लास हातात घेतला आणि म्हणालो, “ग्लास मध्ये थोड पाणी टाक आणि मग बियर ओत.”
माझे हे वाक्य ऐकताच सर्वजण जोरजोरात हसू लागले. “तू ना खरंच शहरात गेलास शिकायला पण जगाचे नॉलेज तुला शून्य आहे. बिअरमध्ये कोण पाणी टाकतं का? ती अशीच प्यायची असते.” विजय म्हणाला. ही गोष्ट मला माहितीच नव्हती की अशी बिअर प्यायली जाते. हळूहळू करून त्या दोन तासात आम्ही प्रत्येकानी एक एक करून बिअर संपवून टाकल्या.
मी घरी आलो, पहिल्यांदा दारू प्यायल्याने नशा तर झालीच होती म्हणून कुणालाच काही न बोलता वरच्या रूममध्ये शिरलो. आईने आधीच तिथे माझ्यासाठी जेवणाचे टाट झाकून ठेवलं होतं. आईचं ती, तिला आपल्या लेकराची चिंता असतेच. या सर्व गडबडीत मी एक गोष्ट विसरून गेलो होतो की मी राणी सोबत मागील चार तास बोललो नव्हतो. ना मेसेज ना कॉल. आम्हाला प्रत्येक मिनिटाला बोलायची सवय असल्याने हे चार तास मी ऑफलाईन होतो त्यामुळे ती चिंतेत असेल म्हणून मी फोन हातात घेतला.
फोन चेक केला तर तिचे १६ मिस कॉल आणि १२ मेसेज होते. मला कळून चुकलं होतं की आता आमच्या राणी साहेबांचा पारा खूप जास्त चढला असेल. मी फोन हातात घेताच तिला कॉल केला. मी हॅलो बोलणार एवढ्यात तिने बोलायला सुरुवात केली, ” ठीक आहेस ना तू? काय रे असा का करतोस? माझा जीव टांगणीला लावायला आवडतो का तुला? कुठे होतास एवढा वेळ? तुझा एक पण मेसेज नाही कॉल सुद्धा नाहीये मग मी काय समजू? सर्व ठीक आहे ना?”
“अग हो हो जरा मला बोलू तर दे काय हवेत आहेस? आधी ऐकून तर घे मग मला बोल लगेच काय सुरू होतेस?”
“एक मिनिट थांब महेंद्र, तुझा आवाज का असा येतोय? तू दारू प्यायला आहेस का?”
“नाही ग. असे का वाटतंय तुला?”
“महेंद्र मला खरं सांग तू दारू प्यायला आहेस का?”
“सॉरी राणी.. पहिल्यांदा प्यायलो. हे मित्र ऐकत नव्हते मग घेतली थोडी.”
“मूर्ख आहेस का तु? अक्कल आहे का नाही तुला? आजपासून माझ्याशी बोलायचे नाही तू समजलं मी तुला ब्लॉक करतेय.” असे म्हणत राणीने मला खरंच ब्लॉक केलं.
आमच्यात या आधी सुद्धा वाद झाले होते पण ते क्षणिक असायचे मी किंवा ती समजून घ्यायची. पण आज पहिल्यांदा तिने मला ब्लॉक केलं होतं. तिचेही बरोबर होतं, मी आज दारू प्यायलो होतो हे कोणत्याच मुलीला आवडणार नाही. पण मी तिला मनवणार कसे तिने तर मला ब्लॉक केलं होतं. मी फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्व सोशल मीडियावर चेक केलं तर तिने सर्व ठिकाणी मला ब्लॉक केलं होतं.
माझाच मला खूप जास्त राग येत होता. स्वतच्या हाताने जोरदार एक कानाखाली मी स्वतःलाच लागावली. माझ्याकडे राणी सोबत बोलण्याचे कोणतेच साधन नव्हते. शेवटी माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी तिला गुगल पे वर मेसेज केला. कुणी कुठेही ब्लॉक केलं तरी इथे मेसेज करण्याची ही कल्पना तुम्ही सुद्धा आमलात आणु शकता फक्त एक लक्षात असूद्या की इथे पाठवलेला मेसेज डिलीट होत नाही.
आधी मी फक्त “सॉरी” म्हणून मेसेज केला. पण समोरून काहीच रिप्लाय आला नाही मग मात्र मी एक भलामोठा मेसेज टाईप केला. “राणी खरंच मनापासून सॉरी. मी कधीच आजवर दारूच्या बाटलीला हात सुद्धा लावला नव्हता. पण आज मित्रांनी जरा जास्तच फोर्स केला आणि त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही. पण मला कळून चुकलं आहे की मी खूप मोठी चुकी केली आहे. दारू ही कधीही वाईट तरी सुद्धा मी तिच्या आहारी गेलो. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. प्लीज मला माफ कर. ” असा मेसेज करून मी राणीच्या रिप्लायची वाट पाहू लागलो.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.
लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)