मला एवढ्या लवकर लग्न करायचे आहे आणि ते ही अशा मुलीशी जिचे आधीच लग्न झालं आहे हे ऐकून खरतर कोणतीही आई भडकली असती, खूप राग राग केला असता पण माझ्या आईची गोष्टच जरा वेगळी होती. ती फक्त हसली आणि म्हणाली, “बाबू कोण पोर हाय? दाकवशील मना यकदा, मनापून बगू दे माज्या पोराला कंची यवरी पोरगी आवरली की तीच लगन झालंय तरी तो तिच्याशी लगन कराला आवरा तयार झाला.”
आईच्या या बोलण्याने मी थोडा शॉक झालो पण तेवढाच आनंदी सुद्धा होतो. अगदी लहान बाळासारखा आईच्या कुशीत शिरलो. पण नंतर आईने जे काही सांगितले ते ऐकून दुःख वाटलं. तिने सांगितले की वयात असताना जेव्हा वडिलांनी तिला लग्नासाठी मागणं घातलं तेव्हा वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी एका विधवेसोबत लग्न करावं? खूप प्रयत्न करून त्यांनी अशा मुली शोधल्या सुद्धा पण काहींनी स्वतः नकार दिला तर काहींनी इच्छा असून पण घरच्यांच्या दबावाखाली येऊन नकार दिला. तीन वर्ष विधवा स्त्री माझे बाबा लग्नासाठी मुलगी शोधत होते. पण त्यांच्या हाती निराशा पडली.
शेवटी आजी आजोबांच्या वयाचा विचार करता त्यांनी माझ्या आईच्या स्थळाला न बघताच होकार दिला. त्यांना हे लग्न फक्त त्यांच्या आई बाबांच्या सुखासाठी करायचं होतं आणि तसे त्यांनी केलं सुद्धा. पण लग्न झालं आणि पुढील तीन दिवस त्यांनी आईचा चेहरा सुद्धा पाहिला नव्हता. जेव्हा त्यांची एकांतात पहिली भेट झाली तेव्हा आधी त्यांनी मला विधवेसोबत लग्न करायचं होतं पण तुझ्याशी झालं, जर संसारात कुठे कमी पडलो तर मला सांभाळून घे, असे सांगितले.
आईला काय वाटेल? तिला राग येईल का? याचा विचार माझ्या बाबांनी केला नव्हता. पण बाबांची हीच गोष्ट आईला खूप जास्त आवडली. यामुळेच त्यांचा संसार खूप वर्ष सुखात गेला. पण आजाराने घात केला आणि बाबांनी आईची साथ खूप कमी वयातच सोडली आणि ते देवा घरी गेले. आज माझ्या रुपात तिला बाबा दिसत होते. एका घटस्फोट झालेल्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून मी नकळतपणे का होईना पण पुन्हा एकदा तिला बाबांच्या जगाची सफर घडवून आणली.
आईने आमच्या लग्नाला होकार दिला होता. एकही इयत्ता न शिकलेली माझी आई एवढी समंजस वाटतं होती की हे सर्व कळायला तिला शिक्षणाची गरज भासली नाही. तिला माझ्यात बाबा दिसत होते आणि म्हणून ती खूप जास्त आनंदी होती. मी राणीला मेसेज केला.
मी: हॅलो एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे. कोणती गोष्ट ऐकायला आधी आवडेल.
ती: आधी गुड न्यूज सांग. खूप दिवस झाले काही आनंदाची गोष्ट कानावर पडली नाहीये. मग नंतर बॅड न्यूज काय आहे ते सांग. इच्छा तर नाही ऐकायची पण तरीही तू सांगशील माहीत आहे.
मी: मग ऐक तर… मी आईला आपल्या प्रेमाबद्दल आणि तुझ्या आधी झालेल्या लग्नाबद्दल सांगितले. अँड गेस व्हॉट.. तिने आपल्या लग्नाला परवानगी दिली. लवकरच तिला तुला भेटायचं सुद्धा आहे. मा के शगून के कंगन तेरा इंतजार कर रहे हैं.
ती: काय? कसे शक्य आहे? एवढ्या लवकर? काय सांगितले तू असे आईना? मला विश्वास बसत नाहीये महेंद्र.
मी: जे काही खर आहे ते सांगितले आणि तिलाही ते पटले. तिच्या मुलाचे त्याच्या होणाऱ्या सूनेवर असलेले प्रेम ती समजून गेली आहे ग राणी बाई आणि विश्वास ठेव आता लवकरच तू राणी महेंद्र पाटील होणार
ती: माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी तू मला दिली आहेस. आज मी खूप जास्त खुश आहे. लव यू ठोंब्या.
मी: लव यू टू राणी. आता वाईट बातमी ऐकायची वेळ झाली.
ती: नाही हा प्लीज नको, अजिबात नाही. मला या आनंदाच्या बातमीवरच माझ्या स्वप्नांचे घर मांडू दे काहीवेळ तरी.
मी: अजिबात नाही. मी आधीच सांगितले होते की दोन बातमी आहेत आणि दोन्ही ऐकाव्या लागतील
ती: हम…. ठीक आहे सांग, तू काय ऐकणार नाहीस.
मी: तू आता फार काळ तुझ्या घरी राहू शकणार नाहीस.
ती: का काय झालं?
मी: कारण मी तुला माझी बायको बनवून आपल्या घरी घेऊन येणार ना.
ती: तू ना खरंच ठोंब्या आहेस ठोंब्या.
मी: जो काही आहे तो आता तुझाच आहे, घे सांभाळून.
ती: सांभाळेन.. सांभाळेन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.
मी: हाये… माझी राणुली.
त्या रात्री आम्ही सकाळी पाच वाजेपर्यंत चॅटिंग केली. त्या दिवशी मुळात आम्हाला वेळेचे भान नव्हतेच. एक क्षण सुद्धा एकमेकांशिवाय जात नव्हता. सकाळी पनवेल बस पकडली आणि कॉलेजकडे रवाना झालो. आता मला माझ्या सोबत एक तरुण मित्र मिळाला होता. आजोबा माझे चांगले बडी झाले होते. आम्ही खूप गप्पा मारायचो. विषय काय आहे? काय नाही याची आम्हाला गरज सुद्धा भासत नव्हती.
कॉलेजमध्ये पोहोचताच एक आनंदाची बातमी आमची वाट पाहत होती. आज आमच्या मॅडम येणार नव्हत्या, मग काय आज आम्हा मुलांना संपूर्ण दिवस रान मोकळं होतं. पण मी राणीने एक कोपरा पकडला आणि आमच्या प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या. होतं ना प्रेमात पडल्यावर की आजूबाजूला कितीही माणसे असुदया.. त्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपल्याला आवडणारा किंवा आवडणारी व्यक्ती सोबत असेल तर फक्त त्याच्यातच संपूर्ण जग सामावून जातं.
मॅडम नसल्याने आम्हाला आज हाल्फ डे दिला, त्यामुळे सर्वांनी आनंदाने घरची वाट पकडली. पण मी आणि राणी मात्र आमच्या दुनियेत हरवून गेलो. इकडेच बाजूला वडाले तलाव आहे आम्ही तिकडेच आमचा मोर्चा वळवला. दुपार असल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं इथे फिरकत होती. आम्ही आमची छोटीशी जागा शोधून तिथेच बस्तान मांडला.
“महेंद्र, सर्व अगदी स्वप्नासारखे वाटतंय रे..! तुझे असे आकस्मात माझ्या आयुष्यात येणे, मला एवढा जीव लावणे, एवढेच काय तर आपल्या लग्नाची बोलणी होणे आणि आईकडून होकार सुद्धा येणे. खरंच असे वाटतंय एखादी फिल्म सुरू आहे आणि त्याची वाटचाल हॅप्पी एडींग कडे सुरू आहे. पण खरंच होईल का रे सर्व ठीक? की नेहमीप्रमाणे माझ्या आयुष्यात फक्त त्रास लिहून ठेवला आहे? काही विपरीत घडले तर?” राणीचे डोळे हे म्हणताना पाणावले होते. तिच्या डोळ्यातून अलगद एक अश्रूचा थेंब रेंगाळत तिच्या गालापर्यंत पोहोचला होता. मी त्या अश्रुला माझ्या चिमटीत पकडले आणि तिला म्हणालो, “आता हे रडणे विसरून जा ग राणी, आता हे अश्रू फक्त मला तू सासरी येताना पाहायचे आहेत, तेव्हा काय ते रडायचे ते रडून घे पण नंतर आयुष्भर मी तुला रडूच देणार नाही. वचन देतो मी तुला. आतापर्यंत तू जे काही सहन केलेस त्याची थोडी सुद्धा आठवण तुला माझ्यासोबत असताना होणार नाही, आयुष्याचा तुझा तो भूतकाळ आता असा काही पुसून जाईल की त्याची आठवण तुला कधीही येणार नाही, मुळात मी ती येऊ देणार नाही.”
माझ्या या बोलण्याने राणी अलगद माझ्या बाहुपाशात शिरली. मी काही बोलणार एवढ्यात तिने तिचे नाजूक ओठ माझ्या ओठावर ठेऊन दीर्घ चुंबन घ्यायला सुरुवात केली. येणारा जाणारा आमच्याकडे पाहून हसेल आम्हाला जज करेल या कोणत्याच गोष्टीचे आम्हाला भान राहिले नव्हते. आम्ही फक्त आमच्या पहिल्या चुंबनाचा आस्वाद घेत होतो. तिचे माझ्या पाठीवर ते रेंगाळनारे हात मला स्वर्ग सुखाची जाणिव करून देत होते. मी अलगद माझा एक हात तिच्या छातीवर फिरवायला सुरुवात केली.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ह्या पण Horror कथा वाचा.
महेंद्र आणि राणीच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने आता अंकुर फुटत आहेत. त्याच्या आईने तर लग्नाला परवानगी देईल पण एका घटस्फोट झालेल्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी समाज देईल? राणीच्या घरचे महेंद्र आणि राणीचे हे प्रेम कसे समजून घेतील? हे सर्व कळेल तुम्हाला पुढच्या भागात. पुढचा भाग सर्वात आधी तुम्हाला वाचायचा असेल तर आजच आपले हे पेज फॉलो करा. कारण कथा फक्त आता सुरू झालीय. यात अजून ट्विस्ट येणार आहेत.
मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.
लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)