आजच्या काळात स्त्रियांनी एकटे प्रवास करणे म्हणजे सुरक्षित मुळीच राहिलेले नाही आणि त्यासाठी महिला रिक्षा चालक हा त्यांच्यासाठी उत्तम मार्ग आहे. या महिलांच्या रिक्षात बसण्यास त्यांना कोणताही त्रास होत नाही. जसा इतर रिक्षा मध्ये होतो. शिवाय स्वतः कामावरून रात्री कधीही घरी जाण्यासाठी त्यांना कोणावर विश्वास ठेवण्याची ही भीती आहेच. यावर उपाय म्हणून त्या महिला रिक्षा चालवतात त्यांच्यामधून प्रवास करणे उत्तम उपाय आहे.
याच महिलांसाठी उभारण्यात आले आहे एक रिक्षा स्टँड. त्यांनाही वाटत असणार ही आपल्याला ही एकप्रकारचे सुरक्षित जीवन जगता यावे आणि आपल्यासाठी ही एक स्टँड असावे आणि म्हणून त्यांच्यासाठी हक्काचा रिक्षा स्टँड उभारण्यात आला आहे. निगडीतल्या भक्ती शक्ती मर्गाजवल हा स्टँड उभारण्यात आला आहे. सध्या तरी यांच्यासारख्या जवळ जवळ 100 महिला रिक्षा चालवत आहेत, शिवाय त्यांनाही आनंद आहे आपल्या पेशाचा कारण महिलांना सुरक्षित घरी पोचिण्याचां आनंद त्यांना नेहमीच मिळत असतो.
त्या महिलांना रिक्षा चालवण्याचे परवाने आणि उत्तम प्रशिक्षण देण्यात आले आहे. रिक्षा चालवून त्या आपल्या संसाराला हातभार लावतात, बाबा कांबळे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष यांच्या मदतीने हे रिक्षा स्टँड उभारण्यात आले आहे. त्या रिक्षा स्टँड मध्ये जवळ जवळ 20 महिला रिक्षा चालक आहेत.
आता या रिक्षावाल्या महिलांच्या जीवनाबद्दल थोड पाहूया. यांचे जीवन तसे नोकरीला जाणाऱ्या महीलांसारखेच धकाधकीचे आहे. स्वतचा धंदा असला तरीही घरातील सगळं उरकूनच त्यांना रिक्षावर यावे लागते, नवऱ्याला डब्बा मुलाना डब्बा, कपडे धुणे, भांडी घासणे पाणी भरणे ही सगळी घरातील कामे आटोपल्यानंतर या महिला रिक्षा चालवण्याचे काम करता असतात. यातून त्यांना ही काही चांगले अनुभव येतात, कोण महिलांसोबत सेल्फी काढतो तर कोणी व्हिडिओ काढतो त्यामुळे त्यांना एकप्रकारे सेलिब्रिटी असल्या सारखे वाटते.
पहिल्यांदा या महिलांना घरातून विरोध होता पण जसं जसे दिवस सरत गेले तास तसे त्यांच्यातील विरोध मावळला त्यांच्या घरातील ही आता त्याच्या पाठी उभे आहेत.