Home Uncategorized अमिताभ बच्चन यांना भेटल्यावर काय म्हणाला समीर चौघुले, वाचून अक्षरशः दंग व्हाल

अमिताभ बच्चन यांना भेटल्यावर काय म्हणाला समीर चौघुले, वाचून अक्षरशः दंग व्हाल

by Patiljee
4632 views

आज म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण टीम अमिताभ बच्चन यांना भेटली. यावेळी समीर चौघुले यांनी आपल्या उत्कृष्ट लेखणी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली. काय आहे ती पोस्ट पाहूया.

समीर चौघुले – तो क्षण…आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा….मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट “एफडी” करून ठेवण्याचा…खूप वेळ भारावून जाण्याचा..तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं…….काल सोनी मराठीचे हेड अजय जी भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचे स्वप्न पूर्ण झालं.. महानायक श्री अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली…आणि हि भेट आमच्या “महाराष्ट्राची हास्यजत्रे”मुळे झाली याचं आम्हाला सर्वांनाच अत्यंतिक समाधान आहे.

बच्चनसर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जोय करतात हे त्यांच्याकडून ऐकण हे केवळ स्वप्नवत होतं…बच्चनसर समोर असून हि दिसत नव्हते..कारण डोळ्यात साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवल होतं..आसव हि वेडी ‘वाहणं’ हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती…पण इवलेसे कान मात्र नदीच पात्र होऊन ऐकत होते……बच्चनसर…२५ मिनिटे बोलले फक्त हास्यजत्रेबद्धल….”आप सब ये कैसे कर पाते हो?….एक मिनिटमे इतका बडा लाफ्टर क्रियेट करना,,..बहोत बढीया …आप सब कमाल हो ” हे असले संवाद बच्चन सरांकडून ऐकण हे अविश्वसनीय नाहीय का हो?

हे सगळ यश आहे आमच्या “हास्यजत्रा कुटुंबा”चं…आमचे दोन खांदे पिलर्स सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, आमचे सर्व तंत्रज्ञ, backstage कलाकार, स्पॉट बोईजदादा, मेकअप, costume, आर्ट डिपार्टमेंट, सर्व क्रियेटिव्ह आणि लेखक, आणि आम्ही कलाकार यांच्या एकत्रित कष्टायचे हे फळ आहे..आणि अर्थात सोनी मराठीच्या संपूर्ण टीमचा खंबीर पाठिंबा यावर हि जत्रा लोकांची टेन्शन दूर करण्याची खरी मात्रा ठरतेय याचं खूप समाधान आहे. मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे अजय भालवणकरसर, अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्ध्गुरू जुवेकर यांचे …निखळ मनोरंजन करण्याच्या एकमेव हेतू मनात ठेऊन भरलेली आमची महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सोमवार ते गुरुवार रात्री ९ ते १० सोनी मराठीवर भरणार आहे……यायला विसरू नका.

मी “जंजीर” या चित्रपटाला माझा जुळा भाऊ मानतो कारण त्याचा हि जन्म १९७३चा आणि माझा हि १९७३चा …आम्ही अनेक वर्षे एकत्र सुखाने एकाच शरीरात जगतोय…पण आम्हा दोघांमध्ये एक फरक आहे…मी स्वभावाने खूप मिळमिळीत आणि बोथट आहे..आणि हा भाऊ मात्र खूप टोकदार आहे..हा एवढ्या वर्षात इतका आत रुतलाय कि तो आता बाहेर काढणं अशक्य आहे…पण आम्हा भावंडांच्या जोडीला कालपासून हि “बच्चनसरांशी भेट” नावाची एक बहिण हि आयुष्यभरासाठी रुतलीय….आम्ही सुखात आहोत..

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल