माधुरी दीक्षित हे बॉलीवुड मधील खूप मोठं नाव, आपल्या दिलखेच अदानी नेहमी प्रेक्षकांच्या मनात आपला एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. नव्वदच्या दशकात एकामागोमाग एक हीट सिनेमे देऊन त्याने अनेक विक्रम आपल्या नावी प्रस्थापित केले होते हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती माधुरी दीक्षित ह्यांच्या वयक्तिक आयुष्याशी निगडित आहे. हरियाणा मधील पंचकुला येथील असणारे त्यांची कोठी ते विकत आहेत. ह्या सर्व व्यवहारासाठी माधुरी आणि त्यांचे मिस्टर श्रीराम नेने गुरुवारीच हरियाणामध्ये पोहोचले आहेत.

ही कोठी कुणाला आणि किती किमतीला विकली आहे ही माहिती सुद्धा समोर आली आहे. पंचकुला भागात MDC सेक्टर ४ मध्ये ही कोठी स्थित आहे. आज ह्या कोठीचे कागदिय व्यवहार पंचकुला तहसील कार्यालयात पूर्ण होणार आहेत. मागील महिन्यात जेव्हा काही कामानिमित्त माधुरी आणि त्यांचे पती हरियाणामध्ये आले होते तेव्हाच ह्या कोठीची डील झाली होती आता फक्त औपचारिकता आणि व्यवहार बाकी आहेत. हे घर माधुरीला १९९६ मध्ये मुख्यमंत्री योजने अंतर्गत मिळालं होत. त्यावलेचे मुख्यमंत्री चौधरी भजनलाल ह्यांनी ही कोठी माधुरीला सुपूर्द केली होती.
ह्या कोठीला तीन करोड दहा लाख अश्या मोठ्या किमतीत क्लिअर ट्रीप डॉट कॉमचे सर्वेसर्वा अमित तनेजा ह्यांनी विकत घेतलं आहे. त्यामुळे माधुरी दीक्षित ह्यांना चांगला व्यवहार झाला म्हणून ही कोठी विकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला सुद्धा मनोरंजन क्षेत्रातील अशा बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला कमेंट द्वारें कळवा. नवीन बातम्यांसाठी आपल्यासोबत जोडून रहा.