Home हेल्थ तुम्हाला जर मधुमेह असेल तर करा हे घरगुती उपाय आणि नियंत्रणात आणा

तुम्हाला जर मधुमेह असेल तर करा हे घरगुती उपाय आणि नियंत्रणात आणा

by Patiljee
668 views

मित्रानो आजच्या जीवनशैलीत मधुमेह होण्याची प्रमाण खूप जास्त वाढले आहे खर तर यासाठी आपण स्वतचं जबाबदार आहोत खान पान आणि सतत बसून असणे, शरीराची हालचाल कमी यामुळे मधुमेह होण्याची संभावना जास्त असते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त वाढणे कशामुळे तर आपण जे अन्न खातो त्याचे नंतर ऊर्जेसाठी साखरेत रूपांतर होते. मधुमेह झालेल्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सतत उच्च स्थराला असते. यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होण्यास प्रतिबंध येतो, अशा लोकांना सतत लघवीला होत असते, तहान जास्त लागते त्यानंतर अनेक रोग शरीराला येऊन मिळतात हृदय रोग, डोळे खराब होणे, स्ट्रोक, किडनी खराब होणे.

एक काळ असा होता जेव्हा व्यक्ती वयस्कर झाल्यावर मधुमेह होत असायचा. पण आताच्या काळात मधुमेह लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वानाच होत आहे आणि या रोगापासून बचाव करण्यासाठी काही उपाय आहेत ते आपण पाहूया.

पहिली गोष्ट म्हणजे आहारात कर्बोदकचे प्रमाण मर्यादित असावे आणि फायबर चे प्रमाण जास्त असावे. बेक केलेलं पदार्थ टाळावेत तसेच फास्ट फूड ही खाऊ नये. भाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश आहारात असावा, दोन वेळा एकदम पोटभरून न जेवता 3 ते 4 वेळा जेव्हा पण थोड थोड खा.

रोज सकाळी तुम्ही कडुलिंबाचा रस घेऊन आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकता

आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मेथीचे दाने दोन चमचे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या आणि त्यातील मेथीचे दाने खा किंवा मेथीची पुड ही तुम्ही दुधातून घेऊ शकता.

आणखी एक उपाय म्हणजे आंब्याची पाने ही पने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ती कडकं वळवून घ्या आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा ही पावडर पाण्यातून घ्या.

आवळ्याच्या रसामध्ये थोडी म्हणजे 2 ग्राम हळद मिसळा आणि तो दोन वेळा घ्या. यामुळे तुमची साखर नियंत्रणात येते.

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दररोज किमान अडीच ते 3 लिटर पाणी घेणे आवश्यक आहे.

जांभळाच्या बी हा सुद्धा मधुमेही रोगांसाठी एक उत्तम उपाय आहे. यासाठी बियांची बिया सुकवून पावडर करा आणि ही पावडर पाण्यातून घ्या. ही पावडर विकत ही मिळते.

मधुमेह असणाऱ्या माणसाला गोड पदार्थ खाण्यापासून अडवलं जातं. अनेकांना फळांचा आस्वाद घेता येत नाही. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने जांभूळ खाल्यानं त्यांचं शुगरचं प्रमाण कमी होतं.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल