आज गुलशन आणि काश्वीची मधुचंद्राची रात्र होती. त्याने रूममध्ये येऊन दरवाजाची कडी आतून लावली. काश्वी खिडकी समोर उभी राहून आकाशातले तारे निहारत होती. त्याच्या येण्याची चाहूल तिला लागली पण तिने ते भासवून दिलं नाही.
“तू का केलेस माझ्याशी लग्न? तुला माहित होत मी दोन महिन्याने गरोदर आहे तरीसुद्धा लग्नाला होकार दिलास? का केलेस असे?” शांत भासत असलेल्या चंद्राकडे पाहत काश्वी म्हणाली.
गुलशन तिच्या जवळ गेला, तिचा हात हातात घेऊन बेडवर बसवलं आणि म्हणाला, “सध्या तू ज्या परिस्थितीत आहेस त्याच परिस्थितीत मी देखील आहे. आपण समदुःखी आहोत. फक्त कारणे वेगवेगळी आहेत.”
“नाही गुलशन, माझी गोष्ट वेगळी आहे. एका नराधमाने माझ्यावर बलात्कार केला. त्याचेच हे मुल पोटात वाढत आहे आणि हे तुला माहित होतं तरीदेखील तू लग्नाला होकार दिलास आणि लग्न केलेस. का केलेस असे?” काश्वी थोडी रागातच म्हणाली.
गुलशन म्हणाला. “तुझ्याशी लग्न करण्याची माझ्याकडे दोन कारणे आहेत आणि ती आयुष्यभर संसार करण्यासाठी पुरेशी आहेत. निदा फाजली यांच्या गझलमध्ये एक सुंदर ओळ. जिस्म की बात नहीं थी, उनके दिल तक जाना था, लंबी दुरी तय करने में वक्त ती लगता है”
“माझ्यावर अत्याचार होण्यापेक्षा कोणतं मोठं कारण तर नसूच शकतं ना? जेव्हा पासून माझ्यावर हा प्रसंग ओढावला आहे तेव्हापासून आजूबाजूची लोक मला विचित्र नजरेने पाहतात, या सर्वात माझी काही चूक नसून सुद्धा मग तू एवढे मोठे पाऊल कसे उचलले? मला खर कारण जाणून घ्यायचे आहे.” काश्वी म्हणाली.
“हो मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी होकार यासाठी दिला कारण लहानपणापासून तू मला आवडत होतीस. तू खूप सुंदर होतीस त्यामुळे मला कधीच माझ्याकडे पाहिले नाहीस, पण प्रेम म्हणजे नक्की काय असते हे माहीत झाल्यापासून मी तुझ्यावरच प्रेम केलं. मग ते शालेय जीवनात असो किंवा कॉलेजमध्ये. माझा कल नेहमी तुझ्याकडे जास्त असायचा. दुसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे मी कधीच बाप बनू शकत नाही आणि तुझ्या पोटात जे बाळ आहे या सर्वात त्याची काय चूक? म्हणून मला माझे नाव त्याला द्यायचं आहे. म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं.”
भयाण शांतता.
लेखक : पाटीलजी. (आवरे, उरण. रायगड)
फीचर्स इमेज क्रेडिट : Jasmin Bhasin