Home बातमी Lovesemester चे कंटेंट चोरी प्रकरण

Lovesemester चे कंटेंट चोरी प्रकरण

by Patiljee
323 views

आमची टीम बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट नोटीस करत आहे. आपण वेबसाईटवर पोस्ट करत असलेला कंटेंट Lovesemester हे UC चॅनल कॉपी करत आहेत. एवढेच काय तर आपण जे काही आजवर लिखाण लिहिले आहे ते सर्व जसेच्या तसे कॉपी करून हा व्यक्ती त्याच्या चॅनेलवर स्वतच्या नावाने पोस्ट करत आहे. आम्हाला माहित आहे तो ही पोस्ट सुद्धा नक्की वाचेल. आमचे त्याला एवढेच सांगणे आहे की आता कायदेशीर कारवाईला तयार राहा. लवकरच आमचा वकील तुम्हाला नोटीस पाठवेल.

आम्ही बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट पाहत आलोय पण आम्हाला वाटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण नाहीच. उलट आपल्या वेबसाइटवरून रोज पाच आर्टिकल कॉपी करून तो त्याच्या वेबसाईटवर टाकतो. हा आकडा अजुन वाढला असता पण जिथे हा व्यक्ती पोस्ट करतो तिथे पोस्ट करायची लिमिट फक्त पाच आर्टिकल आहे. काही असे आर्टिकल आहे जे आम्ही लिहून वेबसाईटवर ठेवले आहेत पण अजुन आपल्या पेजवर पोस्ट सुद्धा केले नाहीत. आणि हेच आर्टिकल हा रथी महारथी टाकून सुद्धा मोकळा.

लिखाण करणे, विषय शोधणे, विचार करणे ह्यात किती वेळ जातो हे ह्याला सांगू. कळणार नाही. त्याला एवढेच कळते. कॉपी करा पेस्ट करा. बस झाले काम. पण मित्रा तुला एवढे कळायला पाहिजे की ह्या मागे किती मेहनत लागते. कॉपी पेस्ट करून स्वतः त्या आर्टिकल चे अधिकार घेऊन तू खूप मोठी चुकी केली आहेस. ह्याचे परिणाम तुला आता कायदेशीर भोगावी लागतील. ज्या प्लॅटफॉर्मवर तू हे आर्टिकल पोस्ट केले आहेस त्यांना सुद्धा एक नोटीस गेली आहे. तुला जर जास्त विषय वाढवायचा नसेल तर लवकरच आमच्या टीम सोबत बोलून घे.

माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आर्टिकल कॉपी करून स्वतः च्या नावाने कुठेही पोस्ट करू नका कारण ह्याचे सर्व अधिकार आमच्याकडे अबाधित आहेत. उगाच तुमच्या वेबसाईटवर कॉपीराइट येऊ शकतो.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल