प्रेम हा अगदी सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाला कधी ना कधी प्रेमात पडायचेच असते बहुदा ते आपोहून ह्या तुडुंब सागरात कधी बुडून जातात हे त्यांचे त्यांना कळत नाही. अर्थातच तुम्ही आम्ही हे कधी ना कधी हा अनुभवलेच असेल. बॉलीवूड मधील एक गाणं अशा परिस्थितीला सुंदर पणे शोभून जातं. हर किसी के दिल मै एक लडके/लडकी का खयाल रहता है, कोई कहता है कोई छुपाता है. ह्या गाण्याने नेहमीच सिंगल लोकांना एक वेगळी प्रेरणा मिळते.
असो, प्रत्येकाचा प्रेम हा आवडीचा विषय. जसजसे आपण वयात येतो, आपल्या आवडी निवडी बदलू लागतात. एका विशिष्ट व्यक्ती बद्दल एक आपुलकीची ओढ निर्माण होते. खरंच किती सुंदर दिवस असतात ना ते, आपण फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला पाहत असतो. त्याच व्यक्तीचा मनात विचार येतो. सिनेमाच्या हिरो हिरोईन मध्ये तुम्ही तुमच्या सोबती त्याच व्यक्तीला पाहता. भविष्याची स्वप्ने आपण त्याच व्यक्ती सोबत पाहू लागतो. नवरा बायको ह्या नात्याचा नीट सां अर्थही माहित नसताना आपण नवरा बायको होण्याचे स्वप्न पाहतो.
पण प्रत्येकालाच त्याचे पहिलं प्रेम मिळतच असं नाही. काही ते व्यक्तच करत नाही तर काही व्यक्त करून सुद्धा त्यांच्या पदरात निराशा पडते. पण काही मात्र ह्याबाबतीत लकी ठरतात. त्यांना त्यांचं पहिलं प्रेम मिळतं. पण जसजसे आपण तारुण्यात प्रवेश करतो. तसतसे आपल्या प्रेमाचे रूपांतर वासनेत होते. सर्वच म्हणता नाही येणार पण ६०% लोक तरी प्रेम फक्त वासने साठी करतात. हे मी सांगत नाही तर USA विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेत समोर आले आहे.
आजकाल प्रेम म्हणजे लोकं खेळ समजू लागले आहेत. एकाच वेळेत अनेकांना डे ट करणे जणू फॅशन झाले आहे. फक्त मुलच नाहीत तर मुली सुद्धा ह्यात अग्रेसर आहेत. एकाच वेळी अनेक मुलांना त्या डे ट करत आहेत. ह्या सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रेम ही खूप पवित्र गोष्ट आहे. जर तुम्ही मनापासून कुणावर प्रेम केले असेल तर तुमच्या आयुष्याचा जोडीदार त्याच व्यक्तीला बनवा कारण असे केल्यास तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात खूप आनंदी राहू शकता.
आता तुम्ही म्हणाल काही लोकं असे करून सुद्धा रोज भांडताना दिसतात. तर ह्याचे सोपे उत्तर आहे. तुम्ही एखाद्यावर का चिडता? रागवता? ती व्यक्ती चुकीची वागते, किंवा विचित्र वागते म्हणून नाही तर ती तुमच्या मनासारखे वागत नाही म्हणून तुमच्यात वाद होतात. तुम्ही तुमचे नात मित्र मैत्रिणी सारखे ठेवा. रोज घडणाऱ्या गोष्टी रात्री वेळ काढून एकमेकांना सांगा, कितीही कंटाळवाणे वाटले तरी हसऱ्या चेहऱ्याने ऐकुन घ्या. बघा तुमच्यात कधीच वा द होणार नाहीत.
आजकाल लग्न होऊन सुद्धा घरात प्रेम मिळत नाही म्हणून लोकं बाहेर प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते आपल्या मित्रांना मोठ्या दिमाखात ह्या गोष्टी सांगतात. पण अशी माणसे प्रेम मिळवण्यासाठी नाही तर वासनेसाठी बाहेर प्रेम शोधतात. मग ह्याला आपण प्रेम म्हणाव का? ह्याचे उत्तर तुम्हीच मला द्या.
हा लेख लिहिण्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे प्रेम करताना स्वार्थ, वासना, उपभोग, अशा गोष्टी पाहू नका. शुद्ध मनाने झालेले प्रेम चिरंतर काळापर्यंत टिकते. (ही पण कथा वाचा : किती सोपे असते ना ब्रेकअप म्हणून एखाद्या व्यक्तीला सोडणे, पण त्यानंतर होणाऱ्या वेदना खूप असह्य असतात. वाचा अशीच एक भाऊक सत्यकथा )