Home बातमी देशात अनेक उद्योग धंदे डबघाईला असताना डी-मार्ट मात्र नफ्यात

देशात अनेक उद्योग धंदे डबघाईला असताना डी-मार्ट मात्र नफ्यात

by Patiljee
417 views

सध्याच्या काळात सरकारच्या आदेशानुसार सगळं काही बंद आहे त्यामुळे कंपनी आणि कारखान्याच्या मालकाला खूप नुकसान झाले आहे आणि होणार ही आहे. आपल्या देशातीलच नव्हे तर या जगातील बडेबडे व्यापारी सध्या तोट्यात असणार आहेत. पण असा एक व्यावसायिक आहे ज्याचा व्यवसाय अशा परिस्थितीत ही जोमाने चालत आहे. ते आहे राधाकिशन दमानी यांचे डी-मार्ट.

सध्या जरी माणूस घरात असला तरी रोजच गरजेनुसार वस्तू आणण्यासाठी माणूस हा डी-मार्ट ला मात्र नक्की जातो आहे. यामुळे डी-मार्ट कमाई ही जोमात होत आहे. राधाकिशन दमानींच्या कमाईचे आकडे मोठं मोठ्या व्यावसायिक तोंडात बोटे घालतील इतके आहेत. या संचार बंदीच्या काळात ही राधाकिशन दमानी यांच्या डी-मार्टच्या व्यवसायात सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या लॉक डाऊन मध्ये डी मार्टने घरपोच डिलिव्हरी ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

ज्या दिवशी लॉक डाऊनची घोषणा झाली. त्या दिवसापासून डी-मार्टच्या बाहेर लोकांच्या रांगच रांग लागलेल्या दिसल्या. पण ह्या रांगा फक्त फक्त लॉक डाऊन मधेच नाहीत तर वर्षातील ३६५ दिवस या रांगा तुम्हाला दिसतील. कारण डी-मार्ट मध्ये मिळणाऱ्या सर्वच वस्तूंवर भरपूर प्रमाणत सूट असते. तांदूळ गहू, डाळी, तेल, थंड्याच्या बोट्टल, दूध ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या येथे भारी डिस्काउंट मध्ये मिळतात. ज्या बाहेर जास्त पैसे मोजून घ्याव्या लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त जनता ही डी-मार्ट मध्ये आपला महिन्याचा किराणा भरण्यासाठी तसेच अन्य गोष्टी घेण्यासाठी जात असते.

राधाकिशन यांनी २००२ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक जागा विकत घेऊन त्यांच्या आयुष्यातील पहिला डी-मार्ट उभारला. त्यांनी डी स्मार्ट मध्ये रोजच्या गरजेच्या सर्व वस्तू ठेवल्या होत्या. मग त्यातून हळू हळू डी-मार्टच्या मालकाने दुसरी जागा घेतली आणि तिथे नवं डी-मार्ट उभं केलं. तीन, चार करता करता डी-मार्टने शाखा वाढवण्यासाठी 2007 साल उजाडलं होतं. या डी-मार्ट मध्ये जवळ जवळ ९९.९९ टक्के गोष्टीत डिस्काऊंट मिळतो. म्हणून ग्राहक पुन्हा पुन्हा डी-मार्टकडे वळतो. सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त डिस्काऊंट मिळत राहिलं पाहिजे, हा डी-मार्टचा अजेंडा त्यांनी यशस्वीपणे राबवत नेला.

प्रत्येक सणाला तुम्हाला डी-मार्ट मध्ये डिस्काउंटमध्ये त्या वेळी लागणाऱ्या वस्तू मिळतील. आता तुम्हाला वाटत असेल की इतक्या कमी किमतीत डी-मार्ट मध्ये सामान कसे काय मिळते? तर एकदम कंपणीमधून अवाढव्य समान उचल्यावर डी-मार्ट ला यावर भरघोस सूट मिळते आणि या सूट वर फक्त १० टक्के डी-मार्ट फायदा होतो.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल