माझ्या गावापासून माझ्या बायकोचे गाव पाच किमी तरी असेल पण सध्या लॉक डाऊन मध्ये आमची सर्व गावे पूर्णतः बंद आहेत. कारण आमच्या बाजूच्या गावात १०० संशयित सापडले आहेत. त्यामुळेच माझी बायको माहेरी अडकून पडली आहे. उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे मला काही करून माझ्या बायकोची भेट घेऊन तिला सर प्राईस द्यायचेच होते. पण ह्यात दोन अडचणी समोर होत्या. एक तर पोलिसांचा चौख बंदोबस्त होता आणि दुसऱ्या रस्त्याने जावे तर मध्ये डोंगर वाट होती.
पण काही करून मला तिला जाऊन भेटायचे होते. रात्री आकाराच्या सुमारास मी गाडी घेऊन निघालो. डोंगरात गाडी नेऊ शकत नव्हतो म्हणून पायथ्याशी गाडी लावली. हातात टॉर्च घेऊन कानात हेडफोन्स टाकून चालू लागलो. पंधरा मिनिटे चालल्यावर आमच्या सौ चे गाव लागणार होते. पण हे पंधरा मिनिटे एवढे सोपे नव्हते. कारण ज्या डोंगराचा इतिहास खूप वाईट होता. जाणकार व्यक्ती सांगतात की इथे नवरा बायको रानात फाटी गोळा करायला गेली होती. पण काही नराधमांनी त्या दोघांना पकडून तिच्या नवऱ्याला तिच्या समोर मारून टाकलं आणि तिच्या अत्याचार करून दोघांचंही मुंडी कापून झाडांना लटकवून दिलं.
तेव्हापासून इथे रात्री चिटपाखरू सुद्धा फिरकत नाही. जे जे रात्री ह्या रस्त्याने जातात त्यांना ह्या दोघांचे दर्शन होतेच होते असे लोक म्हणतात. माझ्या मनात हे सर्व चालूच होते पण तरी सुद्धा लग्नाचा पहिलाच वाढदिवस असल्या कारणाने बायकोची ओढही मनात होतीच. डोंगरातून चालताना आधी तर चांगला रस्ता होता, कारण काळाकुट्ट अंधार होता पण मग मात्र रस्ता दिसेनासा झाला. झाडाची पाने तुडवत मी पुढे चालत होतो. कानात हेडफोन्स घालून सुद्धा असे वाटत होते मागून मला कुणी आवाज देतोय. सरकार….तो आलाय बघा, सोडू नका असे चित्र विचित्र आवाज गाणी चालू असताना सुद्धा मला ऐकु येत होते. त्या आवाजाने मी आजूबाजूला पहिले कोणी आहे का पण कोणीच नव्हते कानात हेड फोन होते तरीही आजूबाजूचा अंधार आणि शांतता मानला चिरत होती. मधेच रडण्याचा आवाज, किंकळण्याचा आवाज, अंगावर काटा आणत होता.
आता मात्र माझे पूर्ण शरीर घामाने भरलं होतं. मी मोबाईलची गाणी बंद केली. आवाज शांत झाला. मी पुढे चाललो की मागून वाटायचं कोणतरी कोणीतरी चालतंय, पण मी मागे वळून पाहिले की कुणीच दिसत नव्हते. वाटलं आता काहीतरी वेगळं घडणार आहे, माझं काही खरं नाही लग्नाचा वाढदिवस इथेच संपणार असे वाटत होते, वाटलं आता पावलं जोरजोरात उचलायला पाहिजेत आणि मी जरा जोरात पाय टाकायला लागलो पाहिलं तर मी धावतच होतो आणि अचानक समोर पाहिले तर एका झाडाला एक बाई उलटी लटकलेली दिसली. काही क्षण मी तिच्याकडे पहातच राहिलो खूप भयावह होता तो क्षण केस मोकळे सोडले होते जवळ जवळ ते जमिनीला टेकले होते इतके लांब होते.
हाचतो क्षण यावेळी काहीतरी करायची गरज होती पण नेहमी करायचं काय धावलो तरी कुठपर्यंत धावणार होतो पण तरीही मनाशी निर्णय घेतला आणि धावत सुटलो मी नुसता धावत नव्हतो तर माझ्या तोंडात देवाचे नाव पण होतेच. देव म्हणजे माझा गणपती बाप्पा माझी बाप्पा वर पहिल्यापासून खूप श्रध्दा म्हणून तर मला लगेच देवानेच नामस्मरण करण्याचे धाडस दिले. मी धावत होतो जीव तोडून पण धावताना बाजूला नजर टाकली तर माझ्या सोबत ती सुधा त्याच जोराने धावत होती, ती म्हणजे हडळ होती चेहरा संपूर्ण विकृत होता डोळ्याच्या खोबण्या त्यात काहीच नव्हतं. शिवाय दातांचे सुळे त्यातून तिचे विचित्र हसणे माझ्या काळजाला चिरत होते. पांढऱ्या साडीमध्ये विद्रूप चेहरा पाहताना माझ्या मनात अधिक भीती निर्माण झाली वाटलं आता आपण संपणार.
तरीही मी धावतच होतो तो तोंडात गणपतीचे नाव घेत होतो पण वाटली इतक्या हळू का बोलतोय, मग मी जोरजोरात बाप्पाचा धावा करू लागलो साईड ला पाहतोय तर ती हडळ गायब झालेली थोड हायस वाटलं. पण तरीही मी धावतच होतो, आज वाट खूप लांब वाटत होती पण मनाशी मी जिद्द केली होती बायको ला भेटणारच काही झाले तरी. धावता धावता समोर पाहिले तर रस्त्याच्या मधेच कोणीतरी बसले होते, मला दाट शंका आली हा त्या बाईचा नवरा असेल मी त्याच्याकडे न पाहता पुढे पुढे जात होतो पण किळसवाणे हसणे माझ्या कानावर आले मागे पहिले तर तीच माणूस हसत होता माझ्याकडे बघून वाटलं आता काही खरं नाही आणि त्यात ती हडळ मागून येत होती वाटलं आता काही क्षणात मला यम न्यायल येईल. पण तरीही मी धावत राहिलो आणि माझे नशीब खरंच बलवत्तर होते चार पावलावर गणपतीचे मंदिर दिसले डोळ्यात आपोआप अश्रू आले माझ्या बाप्पाचे मंदिर आता मला कोणीच काही करू शकणार नाही मी लागलीच त्या मंदिरात शिरलो समोर गणपतीची अप्रतिम मूर्ती होती.
बघताक्षणी देवापुढे हात जोडले आणि नामस्मरण सुरू केले त्या दोघांची हद्द तिथेच संपली होती आणि मागून फक्त आवाज येत होता आज वाचलास तू, आज वाचलास तू. अखेर सुटकेचा निःश्वास तेव्हा सोडला. खूप जोरात ओरडलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी त्याच गावात शिरलो होतो जिथे माझ्या बायकोचे माहेर आहे पण सकाळ झाल्या शिवाय मंदिराबाहेर पाय ठेवला नाही सकाळ झाली आणि बायकोला भेटायला गेलो.
लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड