लॉक डाऊन चार ३१ मे रोजी समाप्त होईल. अशातच पुढे काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार लॉक डाऊन पुढे सुद्धा वाढवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. हा ०.५ लॉक डाऊन १५ जून पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी ह्यांनी पहिला लॉक डाऊन २५ एप्रिल पासून सुरू केला होता. देशाकडून त्यांनी २१ दिवस मागितले होते पण जसजशा नवीन केसेस वाढत गेल्या तसे लॉक डाऊन सुद्धा वाढवण्यात आले. आज दोन महिने होत आले तरी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरूच आहे.
इंडिया टुडेच्या आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी ३१ मे रोजी मन की बात प्रोग्राम करणार आहेत. इथे ते लॉक डाऊन ५ संदर्भात बोलण्याची शक्यता आहे. पण हा लॉक डाऊन मध्ये अनेक ठिकाणी सूट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्या लॉक डाऊन मध्ये धार्मिक स्थळांना पुन्हा एकदा उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते, पण कोणत्याही मोठ्या उत्सवांना किंवा गर्दीला कारणीभूत ठरतील अशा गोष्टी बंद असतील. जास्त लोक एकत्र जमण्याची परवानगी नसेल, सर्वांनी मास्क घालून अंतर ठेवणे बंधनकारक असेल. अशी माहिती मीडिया रिपोर्ट नुसार समोर आली आहे. ह्या आधीच कर्नाटक सरकारने धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यासाठी नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
लॉक डाऊन ५ मध्ये कंटेंनमेंट झोन सोडून इतर सर्व झोन मध्ये सलून आणि जिम उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. लग्न किंवा इतर कार्य करण्यासाठी सुद्धा परवानगी दिली जाऊ शकते पण हे सोहळे कमी लोकात पार पाडावे लागतील. शाळा, महाविद्यालये, युनिव्हर्सिटी ह्या लॉक डाऊन ५ मध्ये तरी उघडण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. शॉपिंग मॉल, चित्रपट गृह अशी ठिकाणे अजुन तरी पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत.
पण सध्या लॉक डाऊन सुरू असला तरी अनेक लोक सर्रास बाहेर पडत आहेत. काही प्रायव्हेट कंपनी ने आपले ऑफिस चालू केल्याने तेथील कामगारांना कामावर जायला लागतं आहे. पण अजूनही कोरोना भारतात आटोक्यात आला नाहीये. आपण अजूनही ह्यातून बाहेर पडलो नाही आहोत. जर अशीच परिस्थिती राहिली तर हाच आकडा अनेक वेगाने वाढेल.