लॉक डाऊन नंतर काही महिने तुम्हालाही लाईट बिल आले नसेल. आनंदही वाटला असेल की सरकारनेने तुमचं लाईट बिल माफ केलं. पण असे अजिबात नाहीये असा प्रत्यय काही महिन्यांपासून आलाच असेल. घरच्या विजेचे बिल हातात येताच तुमच्याही पायाखालची जमीन सरकली असणार ना?
हो हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल. मागच्या महिन्यात भरमसाट बिल आकारणी झाली म्हणून तुम्ही नजीकच्या विजेच्या ऑफिसमध्ये भेट सुद्धा दिली असेल किंवा काहींनी कोण त्रास घेऊन जाणार म्हणून वीज बिल भरले सुद्धा असेल. पण इथे तुम्ही चुकी करत आहात.
जर नेहमी महिन्याला येणारे वीज बिल आणि आता येणारे बिल ह्यात डबल ने नव्हे तर तीन पटीने वाढ झालेली दिसते. हे असे का झाले असावे हा सर्वांना प्रश्न पडला आहे. महावितरण ऑफिसमध्ये भेट दिल्यावर ते म्हणतात की मार्च पासून लॉक डाऊन सुरू झालं त्यामुळे आम्ही तुमच्या घरी येऊन तुमच्या विजेच्या मीटरचे रीडिंग घेऊ शकलो नाही.
त्यामुळे जो विजेचा वापर तुम्ही मागील चार महिन्यात केला त्यानुसार पुढील महिन्याचे आम्ही तुम्हाला लाईट बिल दिलं आहे. इथपर्यंत ठीक आहे आपण मान्यही करू पण हे वीज भरून सुद्धा जुलै मध्ये पुन्हा एकदा मागील तीन महिन्याचे बिल आपल्याला आले. त्याचा जाब विचारला तर तिथले अधिकारी म्हणतात की आम्ही आधी अंदाजे वीज बिल तुम्हाला दिलं होतं.
पण आम्ही आता तुमच्या मीटरची रीडिंग घेतली तर ती अधिक होतेय म्हणून भरलेले वीज बिल कापून राहिलेले बिल तुम्हाला भरावा लागेल. हे असे सांगितल्यावर आपण पुढे काय म्हणणार म्हणून गप्प बसतो. पण ह्यात सुद्धा आपणच फसतो. कसे ते पाहूया.
जर तुमच्या विजेच्या मीटरचे ० ते १०० मध्ये युनिट पडले असतील तर एका युनिट मागे ३.४६ दर आकारला जातो. १०१ ते ३०० असेल तर ७.४३ रुपये, ३०१ ते ५०० १०.३२ रुपये, ५०१ ते १००० असेल तर ११.७१ रुपये आणि १००० च्या वर युनिट पडले असतील तर ११.७१ रुपयाने दर आकारला जातो.
हे सर्व सांगण्याचे उद्देश म्हणजे जर मागील काही महिन्यात तुमचे वीज युनिट १०० च्या आतमध्ये पडत होते तर तुमच्या वीज बिलाची आकारणी ३.४६ दराने व्हायला हवी होती पण ह्याउलट तीन महिन्याचा बिल एकदाच लावल्याने आपले युनिट सहजरीत्या ४०० ते १००० च्या घरात जाऊन बसले. ह्यामुळे नुकसान आपलेच होत आहे.
जुलै महिन्याचे बिल जे आता ऑगस्ट मध्ये तुम्हाला आले असेल त्यात सुद्धा अंदाजे बिल आकारणी केली आहे. रिमार्क मध्ये Faulty असे नमूद केलं आहे. तसे असल्यास वीज न भरता आपल्या चालू मीटर ची रीडिंग घेऊन त्वरित नजीकच्या वीज बिल ऑफिसात मध्ये संपर्क साधावा. आपण टाळाटाळ करतो आणि त्यामुळे नेहमीच असे बिल तुम्हाला भरावे लागते.
०१.०४.२०२० पासून लागू झालेल्या नवीन वीज दरानुसार महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना १० रुपये प्रति महिना अतिरिक्त स्थिर आकार लागू करतात. का? कशासाठी? कुणालाच माहीत नाही.
संबधित बातम्या
होंडाच्या ह्या कारवर मिळत आहे २.५ लाखापर्यंत डिस्काउंट