क्रिकेट हा खेळ कुणाला आवडत नसेल तर नवलच. ह्या क्रिकेट मध्ये अनेक दिग्गज असे खेळाडू होऊन गेलेत ज्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या हृदयावर राज्य केलं. ह्याच खेळाडूंची मुले सुद्धा आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत क्रिकेट मध्ये आपले करियर घडवायला सज्ज आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच चार पिता पुत्र जोड्यांबद्दल सांगणार आहोत. जे लवकरच आंतर्राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करणार आहेत.
अर्जुन तेंडुलकर
भारतीय संघाचा सर्वात मोठा खेळाडू, क्रिकेटचा देव म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे अश्या सचिन तेंडुलकर ह्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच तुम्हाला भारतीय संघात पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अर्जुन सध्या नावारूपास येत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर निळ्या जर्शी मध्ये अर्जुन पाहायला मिळेल. लंडन मध्ये अर्जुन सध्या क्रिकेटचे धडे घेत आहे.

ऑस्टिन वॉ
ऑस्ट्रेलिया संघाचे दिग्गज खेळाडू स्टीव वॉ ह्यांचा मुलगा आहे ऑस्टिन वॉ. आपल्या वडिलांप्रमाणे तो फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये माहिर आहे. हा ही खेळाडू अष्टपैलू म्हणून ऑस्ट्रेलियासाठी उभरत आहे. २०१८ मध्ये खेळलेल्या अंडर-१९ च्या विश्वचषकात त्यांनी चांगली कामगिरी दाखवत सर्वांना स्वतःकडे पाहण्यात भाग पाडले. लवकरच तुम्हाला ऑस्टिन ऑस्ट्रेलियाच्या पिवळ्या कपड्यात खेळताना दिसेल.

थांडो एंटिनी
थांडो एंटिनी दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज मखाया एंटिनीचा मुलगा आहे. थांडोला तुम्ही गोलंदाजी करताना पाहिले तर तुम्हाला असेच वाटेल की तुम्ही मखायाची कॉपी पाहत आहात. हुबेहूब गोलंदाजी करताना तुम्हाला तो दिसेल. आपल्या गोलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

तेज नारायण चंद्रपाल
वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज शिवनारायण चंद्रपाल ह्याला तर तुम्ही सर्वच ओळखत असणार आहात. तेज हा त्याचाच मुलगा आहे. घरेलु क्रिकेट मध्ये अनेक सामन्यात त्यांनी खूप चांगली अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर आंतर्राष्ट्रीय स्तरावर खेळताना तेज तुम्हाला दिसेल.

मित्रानो ह्या चार दिग्गज खेळाडूंनी आपले एक वेगळे स्थान क्रिकेट क्षेत्रात प्रस्थापित केले आहे. ट्याबुके त्यांची मुले सुद्धा पुढे जाऊन काय करतील हे पाहायला सर्वानाच आवडेल.