सध्या अनेक स्टार किड्स बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहेत. ह्यात अजुन एका स्टार किड्सची भर पडली आहे. आपल्या हुरहुंनरी अभिनयाने अनेक वर्ष आपल्याला खळखळून हसवणारे तर कधी खलनायकाची भूमिका साकारून अचंबित करणारे अभिनेते टीनू आनंद सर्वानाच माहित असतील. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक हिट सिनेमे दिले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोंबर १९४५ मध्ये झाला आहे.
त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९८७ मध्ये पुष्पक विमान ह्या सिनेमातून केली. ह्या सिनेमानंतर त्यांनी अनेक चित्रपटात आपला एक वेगळा ठसा उमटविला. अभिनयासोबत त्यांनी शहनशा, कालिया आणि एक हिंदुस्तानी ह्यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा लक्ष्यराज आनंद बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे.
लक्ष्यराज अभिनय क्षेत्रात न उतरता त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अटैक ह्या येणाऱ्या ऍक्शन सिनेमात तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ह्या सिनेमात जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंघ, जॅकलिन फर्नाडीस आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा १४ ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित होईल.

सलमान खानच्या एक था टायगर सिनेमात सुद्धा त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. याचबरोबर बँग बँग, प्यार इम्पॉसिबल, लेडीज व्हर्सेस रिकी बहेल, न्यूयॉर्क ह्या सिनेमात सुद्धा सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केली आहेत. पण अटैक ह्या सिनेमातून तो दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा दिसणार आहे. ह्या सिनेमाचे लेखन सुद्धा त्यांनी स्वतः केलं आहे.