आपल्या लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक पालकांनी त्यांच्या रोजच्या सवयीवर नेहमी लक्ष ठेवायला हवं. कारण मुल जन्माला येण्याच्या अगोदर आपण त्याची संपूर्ण काळजी घेत असतो ते जन्माला आल्यावर तर जास्त काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. आणि हो लहान मुलं ही असतातच वात्रट. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणे खरं तर आपली जबाबदारी आहे असे नाही का तुम्हाला वाटत. आपण एखादी गोष्ट नको करुस असे जेव्हा त्याला सांगत असतो तेव्हा तो नेमके तेच करणार हे आपल्याला ही माहीत असायला हवं. आणि म्हणून मुल ही वाढत्या वयासोबत काही नवीन गोष्टी करायला लागतात.
त्या गोष्टी त्यांच्या शरीरासाठी चांगल्या आहेत की नाहीत याची जाण त्यांना अजिबात नसते. माती खाणे, खडू तोंडात घालने शिवाय खाली पडलेले खाद्य पदार्थ उचलून तोंडात टाकने, मलकटकेली खेळणी तोंडात घालने यामुळे तुमच्या मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात. शिवाय सर्दी, जुलाब असे आजार ओढवले जातात यामुळे तुमची मुले आजारी पडू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांची प्रतिकार शक्ती ही कमी असते त्यामुळे कोणताही आजार त्यांना लगेच जडतो. हे आपल्याला लक्षात असायला हवे. यासाठी आई वडील मुलांना ओरडतात, मारतात पण त्यांची सवय काय जात नाही. यासाठी त्यांना मारू नका हे उपाय करून बघा.
तुमचे लहान मुल माती खात आहे मग लक्षात घ्या की तुमच्या मुलाच्या अंगात रक्ताची कमतरता आहे. यासाठी त्याला रक्त वाढीसाठी हिरव्या भाज्या, बीट, फळे, नाचणीचे पदार्थ द्या त्यामुळे त्यांचे रक्त वाढायला मदत होईल. तसेच बाळाच्या हातात त्याला आवडणारा पदार्थ खायला द्या. त्यामुळे त्याचे मन बाहेरील वस्तूकडे विचलित होणार नाही. लहान मुलांना केळ आणि मध मिळून खायला द्या.
४-५ लवंग घेऊन पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी कमीतकमी दिवसातून तीन वेळा तरी द्यावं. त्यामुळं त्यांची ही सवय सुटू शकते. आपल्या मुलांची डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्यावी. त्यांच्या शरीरात कोणत्या पोषण द्रव्याची काही कमी तर नाही ना हे तपासून पाहावं.