मुंडावली ही नवरा आणि नवरी असणाऱ्यांची एक ओळख आहे असे म्हटले तरी चालेल. कारण लग्न असल्याशिवाय कोणी मुंडावळ्या घालत नाही, मी जेव्हा वयात आले तेव्हापासून मला या मुंडावल्यांचे खूप अप्रुक होते मी कधी घालणार अशा मुंडावळ्या असे नेहमी वाटायचे. मुंडावळ्या घातलेली नवरा किंवा नवरी दिसायला आकर्षक दिसतात. पण या मुंडावळ्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात माहीत आहे का तुम्हाला महराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात आपल्याला याच्या प्रकारात वेगळेपण दिसते.
माझ्या माहितीत गावा ठिकाणी हळदीच्या दिवशी बांधली जाणारी मुंडवली ही फुलांची असते. त्यासाठी रुईच्या झाडांची फुले वापरतात तर काही ठिकाणी या मुंडावळ्या मध्ये भरपूर वेगळेपणा दिसून येतो. वेगवेगळ्या फुलांच्या असतात म्हणजेच मोगरा, निशिगंधा, झेंडू आणि अष्टर तर काही गुलाबाची फुले ही वापरतात.
काही ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीचा पाणी चढविलेल्या मुंडावळ्या घालतात किंवा १ ग्राम सोन आलेल्या मुंडावळ्या ही घातल्या जातात.
बहुतेक ठिकाणी मोत्याच्या मुंडावळ्या वापरल्या जातात दिसायला ही खूप छान दिसतात या मुंडावळ्या, बाजारात वेगवगल्या किमतीत या प्रकारच्या मुंडावळ्या तुम्हाला मिळतील. म्हणजे कमी किमतीच्या ही मिळतात. या मुंडावळ्या मध्ये ही वेगवेगळ्या डिझाईन असतात कुंदन लावतात.
हळदीला जरी रुईची मुंडवळी आणि मोत्याची मुंडवली वापरली जात असली तरी लग्न लावायला बाशिंग वापरतात. ही पद्धत बहुतेक सर्वच ठिकाणी असेल या बाशिंगांशे ही आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
आमच्याकडे अशा प्रकारच्या मुंडावळ्या वापरतात पण तुमच्याकडे कोणत्या प्रकारची वापरतात ते कमेंट करून नक्की सांगा.