Home संग्रह लग्नात आपण नवरा आणि नवरीच्या डोक्यावरून अक्षता टाकतो पण ते का टाकतात हे तुम्हाला माहीत आहे का?

लग्नात आपण नवरा आणि नवरीच्या डोक्यावरून अक्षता टाकतो पण ते का टाकतात हे तुम्हाला माहीत आहे का?

by Patiljee
1143 views

मंडळी सध्या लग्नाचा सीजन आहे, या महिन्यात अनेक वधू आणि वरांचे एकमेकांसोबत धूमधडाक्यात लग्न लावले जाते पण सध्या लॉक डाऊन चालू असल्यामुळे लोकांनी लग्न पुढे ढकलले आहेत, तर काहींनी मोजक्याच बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांना घेऊन मंदिरात लग्न लावले आहे. असो सध्याची परिस्थिती तशी आहे पण सध्या तरी नेहमीची होणारी लग्न यांची खूप आठवण येते नातेवाईक भेटतात, साग्रसंगीत जेवण, नाच गाणे, याचबरोबर सर्वांना एक प्रथा आवडते ते म्हणजे नवरा नवरीच्या डोक्यावरून अक्षता त्याही हळद कुंकू किंवा अन्य रंगात रागावलेल्या असतात त्या टाकण्याची.

या अक्षता म्हणजे आपले तांदूळ ज्याच्यामुळे आपले रोजचे अन्न तयार होते पण हे तांदूळ नवरा आणि नवरीच्या डोक्यावरून का टाकतात हे तुम्हाला माहीत नसेल तर आज आपण ते जाणून घेऊया.

महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षता यांना देवाच्या पूजेत फार महत्त्व आहे. जसे आपण देवपूजा करताना हळद कुंकू वाहतो आणि त्यानंतर अक्षता ही वाहतो. हिंदू धर्मात प्रत्येक पूजेला अक्षता या असतातच.

मित्रानो सध्या जग खूप पुढे गेले आहे त्यामुळे काहीजण तांदळाचा अपव्यय नको म्हणून फुले अंगावर टाकतात. पण तरीही काहीतरी महत्त्व तांदळाला असेल ना त्यामुळे पूर्वीपासून लोक डोक्यावर अक्षता टाकतात, त्यासाठी अन्य कोणतेही धान्य न वापरता फक्त तांदुळच वापरतो.

पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ हे एकदल धान्य आहे. त्याचे दोन भाग होत नाहीत. याचा अर्थ काय तर नवर आणि नवरीच्या सुखी संसारात नेहमी आनंद राहावे हा संसार कधीच मोडकळीस येऊ नये म्हणजे त्याचे दोन भाग होऊ नये.

अक्षता या वधू आणि वरच्या डोक्यावर पडल्याने त्याच्यावर सर्व देवतांची कृपा आहे असे म्हणतात.

शिवाय मुलगी ही आपल्या वडिलांचे घर सोडून दुसऱ्याच्या घरात नांदायाला जाते आणि त्या घरात आणखी बहर आणते. तसेच आपले भाताचे रोपटे असते त्याला अगोदर दुसऱ्या ठिकाणी उगवले जाते आणि ते उपटून दुसऱ्या ठिकाणी लावले जाते आणि हे भाताचे पीक नेहमीच आपल्याला भरभरून देत असते.

शिवाय तांदूळ असे धान्य आहेत जे कीड लागून आतून पोखरत नाही आणि हेच कारण आहे की जे धान्य आतून पोखरले जात नाही ते मुलीच्या अंगावर पडल्यावर संसारात येणाऱ्या अडचणींवर मात करून ये पोखरू देऊ नये म्हणून डोक्यावर तांदूळ टाकले जातात.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल