आपल्या हिंदू धर्मात लग्नाची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. तसेच लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावली जाते. नवरा आणि नवरीला हळदीने माखवताता तसेच आजूबाजूला करवल्या आणि नातेवाईक हे सुध्दा हळदीने माखलेले आपल्याला पाहायला मिळतात. हळद जरी मसाल्याचा पदार्थ असला तरी त्याचे विविध उपयोग आपल्या शरीराला होतात. पण हीच हळद नवरा नवरीला का लावली जाते? याचे शास्त्रीय कारण आपल्यापैकी बऱ्याच जनांना माहीत नसेल.
आता लग्नाच्या आदल्या दिवशीच का हळद नवरा नवरीला लावली जाते? याचे मुख्य कारण म्हणजे हळद ही एक सौंदर्य वर्धक पदार्थ आहे. तो चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे सौंदर्य अधिक खुलून येते. शिवाय हळद ही एक उत्तम अँटी सेप्टिक आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा पुटकुळ्या आल्या असतील तर या हळदीच्या गुणधर्म मुळे त्या ही कमी होतात.
शिवाय मुलींसाठी हळद खूप चांगल्या प्रकारे काम करते. हळदीमुळे मुलींची मासिक पाळी सुरळीत चालते, आणि लग्नानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भधारणा होण्याची क्षमता वाढते. म्हणून हळद लाऊन मुलीला सासरी पाठवली जाते. जेणेकरून घरात लवकर संतती यावी. इतकेच नाही तर गळ्यात आणि हातात ही हळकुंड बांधली जातात, यामुळे शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.
ही अनेक गुणांनी भरलेली हळद हिचे दान करणे शास्त्रात खूप मोठे दान मानले जाते. म्हणून हळदीच्या दिवशी नवऱ्याची उष्टी हळद मुलीच्या घरी जाऊन देण्याची परंपरा आहे. नवऱ्याकडून आलेली हळद मुलीला लावल्याशिवाय तिचा हळद समारंभ चालू केला जात नाही.
सध्या लग्नसराईत अनेक नव नवीन बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे पहिल्यासारखे हल्लीचे लग्न राहिलेले नाही. असो प्रत्येकाची इच्छा असते पण तरीही या इच्छा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही जुन्या चालीरिती आणि परंपरा मोडकळीस आणु नका.
Image Credit : Aqueel Khan