Home विचार लग्न का करतात? लग्न न करता ही जीवन जगू शकतो मग ? वाचा या मागचे खरं कारण

लग्न का करतात? लग्न न करता ही जीवन जगू शकतो मग ? वाचा या मागचे खरं कारण

by Patiljee
456 views

खर तर लग्न करायचं की नाही प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. पण आपल्या समाजात लग्न करणे ही प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आता लग्न का करायचे? हे आपल्या लहानपणापासून मनावर बिंबवलेले असते की एका वयापर्यंत आलो की लग्न करायचे. याशिवाय आपण आजूबाजूला ही लोकांची लग्न झालेली पाहत आलेलो आहोत. लग्न हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

पहिली गोष्ट म्हणजे लग्न झालेले असेल तर त्या पुरुषाला प्रौढ समजतात, एक वेगळा मान मिळतो, समाजात बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. याशिवाय मुलीचे किंवा मुलाचे लग्न झाले की आपन जबाबदारी तून मुक्त झालो असे कुटुंबातील व्यक्तींना वाटते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न झाले की आपल्याला आपली हक्काची व्यक्ती मिळते तसे पाहायला गेल्यास आपली अनेक नाती जवळची असतात पण ती तात्पुरती त्यांच्यात कुठेतरी परकेपणा असतोच. शिवाय त्यांच्यावर इतकाही अधिकार गाजवता येत नाही.

याशिवाय ज्या कुटुंबात आपण राहतो. ते कुटुंब पुढे असेच वाढत राहावे त्याची यापुढेही भरभराट व्हावी कारण वाढते कुटुंब एकमेकांचा आधार असतो. यासाठी लग्न करणे हे आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं मानलं जातं.

जर तुम्हाला वाटत असेल लग्न न करता तुमचे तारुण्याचे आयुष्य सुखात जाईल पण जेव्हा प्रौढत्व येते तेव्हा तुम्ही एकटे पडू शकता. जरी वाटत असेल लग्न केल्यावर जबाबदाऱ्या वाढतात पण त्या घेण्याची ताकद ठेवा आणि तुमचे सांसारिक जीवन सुखी करा. पण जेव्हा लग्न करणार असाल तेव्हा तुमच्या कुवतीप्रमाणे जोडीदार बघा म्हणजे नात्यात कटुता येणार नाही.

लग्न करावं कारण आयुष्यात खूप अडचणी येतात, दुःख येतात, संकट येतात आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी एका जोडीदाराची गरज असते जो आपल्याला समजून घेईल, बाकीचा मित्रपरिवार आपल्याला तात्पुरते सहानभुती देतील पण आपला हक्काचा माणूस अनंतकाळ आपल्या सोबत असणार आहे.

तस बघायला गेलात तर गरिबातला गरीब म्हणजे रस्त्यावर राहणारे लोक ही लग्न करतात आणि श्रीमंत लोक ही लग्न करतात. कारण प्रत्येक व्यक्तीला आपला हक्काचा जोडीदार असायला हवं असे वाटते त्यात काहीच नवल नाही. लग्नाबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल