आमच्या सोसायटी मध्ये एका बिल्डिंगच काम चालू होते, आम्ही रोज तिथून फेरफटका मारतो पण आजचा तेथील बदल काही वेगळच होता. म्हणजेज बांधकाम चालू होते त्याच्या सभोवताली लाल रंगाच्या बाटल्या ठेवल्या होत्या. आता मला प्रश्न पडला की ह्या अशा बाटल्या का बरं ठेवल्या असतील, राहून राहून मला हा प्रश्न सतत त्रास देत होता. तेव्हा तिथल्या समोरच्या एका बाईला विचारले तर ती म्हणाली ” अहो या बिल्डिंग मध्ये काम चालू आहे ना आणि येथे कुत्री येऊन नासधूस करतात म्हणून या लाल रंग मिसलेल्या बाटल्या ठेवल्या आहेत. ह्या बाटल्या ठेवल्यावर कुत्री येत नाही म्हणतात.
म्हणजे बघा ती बाई सुद्धा हेच म्हणाली की ” असे म्हणतात” म्हणजे कदाचित या गोष्टीवर तिचाही विश्वास नसावा, मान्य आहे भटकी कुत्री ही कधीकधी त्रासदायक असतात. त्रासदायक म्हणजे अनेक ठिकाणी जे काम चालू असते ते कधी कधी बिघडवतात बाकी काही नाही. आणि ही समस्या गावातच नाही तर शहरामध्ये ही आपल्याला पाहायला मिळते. पण खरंच का कुत्र्यांच्या या समस्येवर हा उपाय तोडगा आहे? तर अजिबात नाही कारण मी कित्तेक वेळा ह्या लाल बाटल्या जवळ कुत्री बसताना पहिली आहेत.
आणि म्हणून मला तरी ह्या अशा बाटल्या ठेवणे मला तरी चुकीचे वाटते. माझेच नाही तर पशु वैद्याधिकारी यांचेही हेच मत आहे. जसे की या लाल रंगाच्या बाटल्या बघून कुत्री काय कोणताच प्राणी पळून जात नाही. मित्रानो तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट करून सांगा.