Home हेल्थ लाल माठाची भाजी खाल्ली आहे का कधी? खूप उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी

लाल माठाची भाजी खाल्ली आहे का कधी? खूप उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी

by Patiljee
2279 views

आपण आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खा म्हणून सांगत असतो. कारण पालेभाज्या आपल्या शरीर स्वस्थ राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. या भाजीचा रंग हा लाल असतो त्यामुळे या भाजीला लाल माठ असे म्हणतात. साधी सुधी दिसणारी आणि कुठेही उगवणारी ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे कदाचित आपल्यापैकी कित्तेक जणांना माहीत ही नसेल आणि काही जण ही भाजी खात ही नसतील.

या भाजीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि भारतातील प्रत्येक भागात या भाजीला अनेक नावाने बोलले जाते. या भाजीचे हिरवी माठ भाजी आणि लाल माठ भाजी असे दोन प्रकार असतात आणि हे दोन्ही प्रकार आणि हे दोन्ही भाजीचे प्रकार खायला खूप रुचकर असतात. या लाल माठाच्या भाजीत भरपूर प्रमाणत लोह असते तसेच तंतुमय पदार्थ ही भरपूर प्रमाणत असतात. तसेच स्वसणाच्या विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारक आहे. ही भाजी खाल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेॉलचे प्रमाण नियंत्रित राहते शिवाय मधुमेह असणाऱ्यांसाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे.

तसेच ज्या व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता म्हणजे अनेमिया आहे अशा लोकांनी तर ही भाजी अधिक खायला हवी कारण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. तसेच या भाजीत जीवनसत्व अ आणि बीटा केरोटीन हे गुणधर्म असल्याने आपले नाक, डोळे आणि तोंड यांचे तसेच पोटाचे आरोग्य व्यवस्थित चालते. माठाची भाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला व अम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे.

संपूर्ण माठाची एक जुडी  २५ ते ३० लोहाच्या  टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते, जे बाळंतिणीला फार गरजेचे असते. माठ हा लोहयुक्त व रक्त वर्धक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढ्तो. फक्त लसूण, मिरची आणि मीठ वापरून केलेली ही भाजी खायला खूप चवदार असते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल